पोलिसांकडून आता मुलींच्या पालकांचे प्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 12:57 AM2018-05-06T00:57:39+5:302018-05-06T00:57:39+5:30
सिडको : शहरात हेल्मेटसक्ती करण्यात आल्यानंतर मागील वर्षीच्या तुलनेत अपघातात मरण पावणाऱ्यांच्या संख्येत ४५ टक्क्यांनी घट झाली आहे.
सिडको : शहरात हेल्मेटसक्ती करण्यात आल्यानंतर मागील वर्षीच्या तुलनेत अपघातात मरण पावणाऱ्यांच्या संख्येत ४५ टक्क्यांनी घट झाली आहे. पूर्वी फारच थोडेजण हेल्मेटचा वापर करीत होते, आता पोलिसांच्या कारवाईच्या धाकाने व प्रबोधनामुळे अनेकजण हेल्मेटचा वापर करत असताना दिसून येतात. या हेल्मेट प्रबोधनाप्रमाणेच आता मुलींच्या पालकांचे प्रबोधन करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सांगितले.
अंबड पोलीस ठाण्यात अचानाक पाहणीसाठी आलेले असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड उपस्थित होते. यावेळी आयुक्त सिंगल यांनी सांगितले की, शहरातून महिला किंवा मुली यांचे पळून जाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे या विषयावर सर्वच पोलीस ठाण्यात खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील एकूण आकडेवारीच्या तुलनेत सिडको म्हणजेच अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतूनही सर्वाधिक मुली पळून गेल्याचे दिसून येत आहे. यावर आळा घालण्यासाठी आता पोलिसांकडून पालकांचेच प्रबोधन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुली पळून का जातात याची खबरदारी घेतली पाहिजे व यासाठी पालकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तंबाखूमुक्त शहर करण्याचा संकल्प करण्यात आला असून, येत्या काळात त्यावरही काम करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. टिप्पर गॅँगवर कारवाई झाली असली तरी त्यांच्याशी संपर्कात असणाºयांवर आता कारवाई करण्यात येणार आहे.