‘पोलीसदादा’ उतरले निवडणुकीच्या रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:49 AM2019-01-18T00:49:31+5:302019-01-18T00:49:51+5:30

एरव्ही कोणतीही निवडणूक असो, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी निवडणूक बंदोबस्तावर तैनात राहणारे खाकी वर्दीतील ‘पोलिसदादा’ आता स्वत:च निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, नाशिक जिल्हा पोलीस को-आॅप. क्रेडिट सोसायटीच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच ६९ वर्षांनंतर होत असलेल्या लोकशाही पद्धतीच्या निवडणुकीत यंदा पोलीस कर्मचाऱ्यांनी पॅनल करून रिंगणात उडी घेतली आहे.

'Police Officer' in the fray for the election | ‘पोलीसदादा’ उतरले निवडणुकीच्या रिंगणात

‘पोलीसदादा’ उतरले निवडणुकीच्या रिंगणात

Next
ठळक मुद्देपोलीस सोसायटी : ६९ वर्षांत पहिल्यांदा निवडणूक

संदीप झिरवाळ । पंचवटी : एरव्ही कोणतीही निवडणूक असो, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी निवडणूक बंदोबस्तावर तैनात राहणारे खाकी वर्दीतील ‘पोलिसदादा’ आता स्वत:च निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, नाशिक जिल्हा पोलीस को-आॅप. क्रेडिट सोसायटीच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच ६९ वर्षांनंतर होत असलेल्या लोकशाही पद्धतीच्या निवडणुकीत यंदा पोलीस कर्मचाऱ्यांनी पॅनल करून रिंगणात उडी घेतली आहे.
पोलीस को-आॅप. क्रेडिट सोसायटी निवडणुकीच्या निमित्ताने निवडणूक रिंगणात उतरलेल्या पोलीसदादांनी गावोगाव सभासदांची भेट घेऊन प्रचार यंत्रणा राबविण्यास सुरुवातदेखील केली आहे. विशेष म्हणजे प्रचार करताना पोलिसांनी बॅनर, पोस्टर बनविले असून निवडणूक जाहीरनामादेखील प्रसिद्ध केला आहे. येत्या रविवार, दि. २० जानेवारी रोजी नाशिक जिल्हा पोलीस को आॅप. क्रेडिट सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक होत असून यासाठी सुमारे ५१०० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी नाशिक जिल्ह्यात तालुकानिहाय २० मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. रविवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सोमवारी लगेचच हिरावाडी रोडवरील दीपलक्ष्मी मंगल कार्यालयात मतमोजणी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अर्चना सैंदाणे काम बघत आहेत.
पोलीस को-आॅप. क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीसाठी प्रगती परिवर्तन व सहकार असे तीन पॅनल पंधरा उमेदवार घेऊन निवडणुकीच्या रिंगणात पूर्णपणे तयारीनिशी उतरले आहेत. १५ जागांसाठी होणाºया संचालक मंडळात सर्वसाधारण १०, अनुसूचित जाती जमाती १, भटक्या विमुक्त १, इतर मागास १, तर महिला राखीव २ अशा जागांचा समावेश आहे. १९५० रोजी स्वातंत्र्यानंतर नाशिक जिल्हा पोलीस को-आॅप. क्रेडिट सोसायटीची स्थापना करण्यात आलेली आहे. या सोसायटीवर ग्रामीण पोलीस उपअधीक्षकाचे पूर्णपणे नियंत्रण असायचे. आता लोकशाही पद्धतीने पहिल्यांदाच निवडणूक होणार असल्याने सोसायटीवर पोलीस कर्मचारीच संचालक म्हणून बसणार आहेत.
सोसायटीचे कार्य
पोलीस क्रेडिट सोसायटीच्या सभासदांना कर्जवाटपासाठी सोसायटी कोणत्याही बँकेकडून कर्ज घेत नाही तसेच सभासद सोडून इतर कोणालाही कर्जवाटप केले जात नाही. सोसायटी सभासदांच्या वर्गणीतून जमा झालेल्या रकमेतूनच कर्जवाटप केले जाते. पूर्वी ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्जवाटप मर्यादा होती. आता त्यात चार लाख रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. निवडणुकीत पोलीस शिपाई, महिला पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस ठाणे, लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभाग, शहर वाहतूक शाखा, गुन्हे शाखा, स्थानिक गुन्हे शाखा, वायरलेस, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, तसेच पोलीस मुख्यालय अशा विभागातील कर्मचाºयांचा सहभाग आहे.
जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार आणि निवडणूक
नाशिक जिल्हा पोलीस क्रेडिट को-आॅप. सोसायटीला यापूर्वी संचालक मंडळ नव्हते. विना संचालकांची सोसायटी म्हणून ओळख होती. नाशिक ग्रामीण पोलीस उपअधीक्षक यांचे सोसायटीवर नियंत्रण असायचे. सोसायटीबाबत काही पोलीस कर्मचाºयांनी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार करून लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्याची मागणी केली होती त्यानुसार पहिल्यांदाच मतदान घेऊन निवडणूक होत आहे.

Web Title: 'Police Officer' in the fray for the election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.