राजकारण्यांसह पोलीस अधिकाऱ्यांनी घेतला ‘मडबाथ’चा आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 12:22 AM2018-04-02T00:22:41+5:302018-04-02T00:22:41+5:30
नाशिक : सुमधुर संगीत, संगीताच्या तालावर संपूर्ण अंगाला लावला जाणारा चिखल, चिखलामध्ये लोळणारी माणसे पाहून हे दुर्गम भागातून आलेत की काय असे विचारले जाणारे प्रश्न? हे दृश्य होते नाशिक-पेठरोडवरील तवली- फाट्याजवळ आयोजित आगळ्या-वेगळ्या ‘मडबाथ’ उत्सवाचे़
नाशिक : सुमधुर संगीत, संगीताच्या तालावर संपूर्ण अंगाला लावला जाणारा चिखल, चिखलामध्ये लोळणारी माणसे पाहून हे दुर्गम भागातून आलेत की काय असे विचारले जाणारे प्रश्न? हे दृश्य होते नाशिक-पेठरोडवरील तवली- फाट्याजवळ आयोजित आगळ्या-वेगळ्या ‘मडबाथ’ उत्सवाचे़ विशेष म्हणजे अंगाला चिखल लावल्यानंतर आपल्यासोबत असलेले हे तेच का? असा प्रश्न निर्माण होऊन
त्यांना ओळखणेही कठीण जात होते़ रविवारी सकाळी सात वाजेपासून या कार्यक्रमास सुरुवात झाली़ या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी आले होते़ अंगाला चिखल फासल्यानंतर सुमारे एक तास उन्हात चिखल सुकवायचा व त्यानंतर शॉवरखाली किंवा या ठिकाणी असलेल्या विहिरीत डुबकी मारायची़ ज्येष्ठ पोलीस अधिकारी हरिष बैजल, नवलनाथ तांबे, भाजपाचे महानगर सरचिटणीस उत्तमराव उगले, नगरसेवक अॅड. श्याम बडोदे, विशाल उगले, अॅड. वैभव शेटे, राजेंद्र फड, डॉ. ज्ञानेश्वर चोपडे, अमित घुगे, डॉ. विश्वास सावकार आदींसह शेकडो नागरिकांनी या मडबाथचा आनंद लुटला़ या मडबाथ कार्यक्रमाची तयारी सुमारे महिनाभर आधीपासून केली जाते़ वारुळाची माती गोळा करायची, आठ दिवस ही माती भिजवायची आणि संपूर्ण शरीराला लावून उन्हात सुकविल्यानंतर आंघोळ करायची़ यामुळे शरीरातील उष्णता निघून जाण्याबरोबरच त्वचा चकचकीत होत असल्याचे नंदू देसाई यांनी सांगितले़