गंगापूर धरणाजवळ पोलीस चौकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 12:25 AM2018-12-23T00:25:43+5:302018-12-23T00:26:13+5:30

धरण परिसरातील सुरक्षा, भुरट्या चोऱ्या, सुला वाइन, सोमा वाइन, धरणाचा आजूबाजूचा परिसर तसेच दुगाव, महादेवपूर आणि यशवंतनगर परिसरातील नागरिकांना सुरक्षा तसेच संरक्षणासाठी दुगाव पोलीस चौकी कार्यान्वित करण्यात आली आहे़

 Police outpost near Gangapur dam | गंगापूर धरणाजवळ पोलीस चौकी

गंगापूर धरणाजवळ पोलीस चौकी

Next

गंगापूर : धरण परिसरातील सुरक्षा, भुरट्या चोऱ्या, सुला वाइन, सोमा वाइन, धरणाचा आजूबाजूचा परिसर तसेच दुगाव, महादेवपूर आणि यशवंतनगर परिसरातील नागरिकांना सुरक्षा तसेच संरक्षणासाठी दुगाव पोलीस चौकी कार्यान्वित करण्यात आली आहे़ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजय बर्वे यांच्या हस्ते या पोलीस चौकीचे उद्घाटन करण्यात आले.  अडचणी सोडविण्यासाठी गिरणारे पोलीस चौकीचे अंतर अधिक होते़ त्यामुळे अचानक घडलेल्या घटनांना वेळीच पायबंद घालण्यासाठी दुगावला पोलीस चौकीची आवश्यकता होती व त्याबाबत ग्रामस्थांनी वारंवार मागणीही केली होती़ या पोलीस चौकीचे उद्घाटन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजय बर्वे यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे, शिवसेनेचे आमदार योगेश घोलप, नाशिक तालुका पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक रणजित आंधळे, सहा. पोलीस निरीक्षक सार्थक नेहते आदि उपस्थित होते.  नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संजय दराडे, यांनी अत्याधुनिक व सर्वसुविधा असलेली दुगाव पोलीस चौकी कार्यान्वित केली आहे़ दुगाव ग्रामस्थांच्या सततच्या मागणीमुळे या पोलीस चौकीची निर्मिती करण्यात आली असून या ठिकाणी एक सहा पोलीस निरीक्षक आणि चार कर्मचारी तैनात असणार आहेत़

Web Title:  Police outpost near Gangapur dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.