अंबड पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस चौक्या बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:21 AM2020-02-22T00:21:12+5:302020-02-22T01:15:55+5:30
अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार, टवाळखोरांचे उपद्रव याबरोबरच वाढती गुन्हेगारी यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस गस्त वाढविण्याबरोबरच बंद असलेल्या पोलीस चौक्यांमध्ये कायमस्वरूपी पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी मागील महिन्यात अंबड पोलीस ठाण्यात घेण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत सांगितले, परंतु आजही परिस्थिती ‘जैसे थे’च असून, अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही पोलीस चौक्या अद्यापही बंद असल्याने चित्र बघावयास मिळत आहे.
सिडको : अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार, टवाळखोरांचे उपद्रव याबरोबरच वाढती गुन्हेगारी यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस गस्त वाढविण्याबरोबरच बंद असलेल्या पोलीस चौक्यांमध्ये कायमस्वरूपी पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी मागील महिन्यात अंबड पोलीस ठाण्यात घेण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत सांगितले, परंतु आजही परिस्थिती ‘जैसे थे’च असून, अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही पोलीस चौक्या अद्यापही बंद असल्याने चित्र बघावयास मिळत आहे.
अंबड येथील महालक्ष्मीनगर भागात मागील महिन्यात दोघा गुंडांनी पाणीपुरी विक्रेत्यास जबर मारहाण करीत दहशत पसरविल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर गुंडागर्दी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी अंबड व सिडको भागांतील नागरिकांनी केली होती. या पार्श्वभूमीवर जानेवारी महिन्यात अंबड पोलीस ठाण्याच्या आवारात पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाढती गुंडागर्दी, अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटनांबरोबरच उद्याने तसेच चौकांत वाढलेल्या टवाळखोरांचा उपद्रव, दारू दुकानांसमोरील मद्यपींकडून होत असलेला त्रास यामुळे सिडको व अंबड भागांतील सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असल्याच्या सूचना नागरिक व लोकप्रतिनिधींनी आयुक्तांकडे मांडल्या होत्या. यावेळी पोलीस आयुक्त नांगरे-पाटील यांनी आयुक्तालय हद्दीतील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई सुरू आहे, तसेच गुन्हेगारांना तडीपार करण्याबरोबरच काहींना एमपीडीए या कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. यामुळे परिसरात पुन्हा भुरट्या चोºया तसेच गुन्हेगारी वाढली असल्याने बंद पोलीस चौक्यांमध्ये कामयस्वरूपी पोलीस कर्मचाºयांची नेमणूक करण्याबरोबरच पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी केली जात आहे.
जुने सिडको परिसरातील पोलीस चौकी बंद असल्याने परिसरात भुरट्या चोºया वाढल्या असून, मोबाइल चोरीच्या प्रकारातही वाढ झाल्याने याठिकाणी कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी असणे गरजेचे आहे.
४प्रत्येक भागांतील नागरिकांच्या वेगवेगळ्या समस्या सोडविण्यासाठी सोशल पोलिसिंग सुरू असल्याचे नांगरे-पाटील यांनी सांगितले होते. तसेच अंबड पोलीस हद्दीतील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी बंद असलेल्या पोलीस चौक्या कार्यान्वित करणार असल्याचे सांगितले होते. परंतु आजही महालक्ष्मीनगर भागासह खुटवडनगर या भागातील पोलीस चौक्या कायमच बंद असून, त्रिमूर्ती चौक व शिवाजी चौक येथील पोलीस चौकीत कधी कर्मचारी दिसत नसल्याचे अनेक वेळा आढळून येत आहे.