लढाईच्या वेळी पोलीस पाटील दुर्लक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 04:21 PM2020-04-04T16:21:43+5:302020-04-04T16:27:10+5:30
चांदोरी : कोरोनाच्या जागतिक आपत्तीच्या काळात पोलिसांना प्रोत्साहन भत्ता देण्याच्या प्रयत्नात ग्रामीण भागातील महसूल, पोलीस प्रशासनाचा महत्वाचा दुवा असलेले पोलीस पाटील गेल्या सहा महिन्यांपासून मानधनापासून वंचित आहे. हे मानधन मिळण्याबरोबरच विम्याचे संरक्षण कवच मिळावे अशी मागणी निफाड तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष अनिल गडाख यांनी केले आहे.

गावपातळीवर महसुल व पोलीस प्रशासनाचा शेवटचा घटक म्हणून कार्य करताना मागील वर्षापासून महिना ६५०० रु मानधन केले असून सप्टेंबर २०१९ पासून हे मानधन रखडले गेले आहे.
यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरून गावात येणाऱ्या व्यक्तींची चौकशी करून नोंद करणे, त्या याद्या प्रशासनाला देणे या बरोबरच लॉक डाऊनच्या काळात नागरिक घराबाहेर राहणार नाही यासाठी खबरदारी घेण्याबरोबरच ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्याचे काम पोलीस पाटलांना करावे लागत आहे.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरोनाच्या काळात कार्यरत असणाºया शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर १००० रु पये व २५ लाखाचे विमा कवच जाहीर केले आहे, मात्र कोरोना निर्मूलन काळात काम करताना पोलीस पाटील हा घटक वंचित राहिला असून त्याला लवकरात लवकर मानधन देण्याबरोबरच विमा संरक्षणाचा लाभ मिळावे अशी मागणी ही गडाख यांनी केली आहे.