पोलीस कर्मचाऱ्यांनी समान न्यायासाठी काम करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:57 AM2018-11-20T00:57:16+5:302018-11-20T00:57:34+5:30

वर्दीबाबत प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचा-यास अभिमान असायलाच हवा, तसाच तो स्वत:बद्दलही असणे गरजेचे आहे़ चांगली मानसिकता, शारीरिक सुदृढता याबरोबरच आपले कुटुंबीय, आपले शहर, राज्य, देश व समाजाप्रती पोलीस कर्मचाºयांना आपुलकी असणे गरजेचे असून, प्रत्येकाने सामाजिक भेदभाव न करता प्रत्येक नागरिकाला समान न्याय कसा मिळेल यासाठी प्रयत्नशील राहून काम करावे, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी केले़

 Police personnel should work for equal justice | पोलीस कर्मचाऱ्यांनी समान न्यायासाठी काम करावे

पोलीस कर्मचाऱ्यांनी समान न्यायासाठी काम करावे

Next

नाशिक : वर्दीबाबत प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचा-यास अभिमान असायलाच हवा, तसाच तो स्वत:बद्दलही असणे गरजेचे आहे़ चांगली मानसिकता, शारीरिक सुदृढता याबरोबरच आपले कुटुंबीय, आपले शहर, राज्य, देश व समाजाप्रती पोलीस कर्मचाºयांना आपुलकी असणे गरजेचे असून, प्रत्येकाने सामाजिक भेदभाव न करता प्रत्येक नागरिकाला समान न्याय कसा मिळेल यासाठी प्रयत्नशील राहून काम करावे, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी केले़  पोलीस आयुक्तायातील कॉन्फरन्स हॉलमध्ये पोलीसमित्र योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाºयांच्या प्रशिक्षण शिबिरातील विजेत्यांना बक्षीस वितरणप्रसंगी सिंगल बोलत होते़ यावेळी शिबिरातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थींना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. आतापर्यंत सुमारे ८० प्रशिक्षण सत्रे पार पडली असून, त्यातून सुमारे दोन हजार कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सोमनाथ राठी यांनी प्रत्येकाने आपल्यातील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांचा आपल्या कामात कुशलतेने वापर करणे, शरीराबरोबरच मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी कारायचे व्यायाम, सतत प्रोत्साहित राहून कामात आनंद निर्माण करण्याचे विविध उपाय
सांगितले.  यावेळी विशेष शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, पोलीस कल्यााण विभागाच्या पोलीस निरीक्षक संगीता निकम, पोलीस उपनिरीक्षक नयना आगलावे, कर्मचारी रुचा हिरे, हेमंत बढे आदी उपस्थित होते.

Web Title:  Police personnel should work for equal justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.