पोलिसांचे शक्तिप्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 01:03 AM2017-09-01T01:03:58+5:302017-09-01T01:04:14+5:30
आगामी गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, राज्य राखीव दलाची तुकडी घेऊन सशस्त्र संचलन करीत शक्तिप्रदर्शन केले.
नाशिक : आगामी गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, राज्य राखीव दलाची तुकडी घेऊन सशस्त्र संचलन करीत शक्तिप्रदर्शन केले.
समाजकंटकांवर वचक निर्माण करण्यासाठी शहरात संचलन करण्यात आले. पोलिसांच्या या सशस्त्र संचलनात जलद प्रतिसाद पथकाच्या जवानांची तुकडी, राज्य राखीव दलाच्या जवानांच्या तुकडीसह त्यांच्या अतिसंरक्षित रचनेच्या वाहनांनी लक्ष वेधले. डोंगरे वसतिगृह मैदान, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, धुमाळ पॉइंट, मेनरोड, भद्रकाली, शहीद अब्दुल हमीद चौक , वाकडी बारव, चौकमंडई, बागवानपुरा, द्वारकापर्यंत पोलिसांनी संचलन केले. अग्रभागी पोलिसांची वाहने व वरिष्ठ अधिकारी संचलनाचे नेतृत्व करीत होते. अचानकपणे रस्त्यावर उतरलेला सशस्त्र पोलिसांचा फौजफाटा बघून अनेकांना मोबाइलद्वारे क्लिक करण्याचा मोह आवरता आला नाही.