ओझर शिवारात कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 07:29 PM2019-05-10T19:29:26+5:302019-05-10T19:29:33+5:30
ओझर: येथून जवळच दिक्षी रोडवर असणाऱ्या आलसाना डेअरी फार्मच्या शेजारी असणार्या शेडमध्ये नाशिक ग्रामीण पोलिसांनी गुरु वारी रात्री आठ च्या दरम्यान कत्तलखाण्यात धाड टाकून गोवंश जनावरे व गोवंश जनावरांच्या जातीचे कातडी,मांस असा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाईमुळे ओझर शहरात एकच खळबळ उडाली आहे.गुरु वारी रात्रभर सदर कारवाई सुरू होती.
ओझर: येथून जवळच दिक्षी रोडवर असणाऱ्या आलसाना डेअरी फार्मच्या शेजारी असणार्या शेडमध्ये नाशिक ग्रामीण पोलिसांनी गुरु वारी रात्री आठ च्या दरम्यान कत्तलखाण्यात धाड टाकून 42 गोवंश जनावरे व गोवंश जनावरांच्या जातीचे कातडी,मांस असा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाईमुळे ओझर शहरात एकच खळबळ उडाली आहे.गुरु वारी रात्रभर सदर कारवाई सुरू होती.
यतींद्र कांतीलाल जैन रा.भिवंडी जिल्हा ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी ही कारवाई केली ,या बाबत अधिक माहिती अशी की जैन यांनी फिर्याद दिल्यानंतर ओझर पोलीस फौजफाट्यासह गुरु वार दि नऊ मे रोजी रात्री आठ वाजता ओझर शिवार येथील या शेड मध्ये व शेजारील गोठ्यामध्ये बेचाळीस गोवंश जनावरे कोंबून बांधून ठेवलेले दिसले,याच ठिकाणी गोवंश जनावरांची कातडी ८७नग,व ५५ किलो हाडामांसाचे तुकडे मिळून आले याच ठिकाणी जनावरे वाहण्यासाठी असणारी पीक अप व्हॅन क्र ं एम एच १५,ई जि ८५७० ही देखील सापडली
ओझर पोलिसांनी या प्रकरणी छोटू उर्फ रिफक जाफर कुरेशी रा वडाळा नाशिक,नितीन मधुकर बंदरे रा. मातंगवाडा ओझर, हुसेन हनिफ कुरेशी रा. साठेनगर वडाळा नाशिक,नजीब इकबाल मंसुरी रा. द्वारका नाशिक यांना अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे . या छाप्यामध्ये पोलीस उपअधीक्षक अरु ंधती राणे,पोलीस निरीक्षक भगवान मथुरे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील,उपनिरीक्षक अजय कवडे व इतर पोलीस सहभागी झाले होते.आरोपींना पिंपळगाव न्यायालयात हजर केले असता न्या.हुरगट यांनी त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.पुढील तपास ओझर पोलीस करीत आहे.
चौकट:कुणालाही लवकर लक्षात येणार नाही अशा ठिकाणी शेतात सदर कत्तलखाना सुरू होता.सुरवातीला रस्त्यावर उभ्या असलेल्या पोलिसांना काहीच दिसले नाही पण काहींनी पुढे जात विरु द्ध दिशेला दरवाजा असलेल्या शेड मध्ये छापा मारला आण िमुद्देमाल हस्तगत केला.पोलिसांनी ज्या ठिकाणाहून जिवंत गायी ताब्यात घेतल्या त्यांना तातडीने पाणी चारा देत एका गाडीत टाकून पिंपळगाव येथे गोशाळेकडे सुुपूर्द करण्यात आले.उर्विरत जप्त केलेलं साहित्य ओझर पोलिसांनी गाडी सह जमा केले.
फोटो:कत्तलखान्यातुन अटक करण्यात आलेल्या चौघा आरोपीं समवेत पोलीस निरीक्षक भगवान मथुरे उपनिरीक्षक अजय कवडे,बाळासाहेब पानसरे व पोलीस कर्मचारी.(10ओझरकत्तलखाना)