गावठी दारूभट्टीवर पोलिसांचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:16 AM2021-05-07T04:16:11+5:302021-05-07T04:16:11+5:30
इगतपुरी : तालुक्यातील त्रिंगलवाडी येथे डोंगराच्या पायथ्याजवळ गावठी दारूची भट्टी सुरू असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने छापा टाकत घटनास्थळावरील ...
इगतपुरी :
तालुक्यातील त्रिंगलवाडी येथे डोंगराच्या पायथ्याजवळ गावठी दारूची भट्टी सुरू असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने छापा टाकत घटनास्थळावरील हातभट्टी उद्ध्वस्त केली आहे. यावेळी पोलिसांनी मुद्देमालासह सुमारे ४५० लिटर गावठी दारू जप्त केली आहे.
पोलीस कर्मचारी राजेंद्र चौधरी यांनी फिर्याद देत हातभट्टी दारू तयार करणारा रामदास खडके (रा. त्रिंगलवाडी) याला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करीत आहे.
कोरोना महामारीच्या संकटामुळे निर्बंध लागू असतानाही तालुक्यात गावठी दारू मुबलक उपलब्ध होत असल्याची पोलिसांना गुप्त खबर लागली होती. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत त्रिंगलवाडी येथील हातभट्टीवर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी हातभट्टीचे साहित्य जप्त केले. आणखी काही ठिकाणी पोलीस पथक गावठी दारूच्या भट्ट्यांचा शोध घेत असून अनेक ठिकाणी छुप्या मार्गाने विकल्या जाणाऱ्या मद्यावरही कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
फोटो - ०६ हातभट्टी-१
त्रिंगलवाडी येथे हातभट्टी उद्ध्वस्त करून मुद्देमाल ताब्यात घेताना पोलीस निरीक्षक समाधान नागरे, पोलीस कर्मचारी राजेंद्र चौधरी, मुकेश महिरे.
===Photopath===
060521\06nsk_27_06052021_13.jpg
===Caption===
फोटो - ०६ हातभट्टी-१त्रिंगलवाडी येथे हातभट्टी उद्धवस्त करून मुद्देमाल ताब्यात घेतांना पोलीस निरिक्षक समाधान नागरे, पोलीस कर्मचारी राजेंद्र चौधरी, मुकेश महिरे.