१९ मसाज सेंटरवर पोलिसांचे छापे

By admin | Published: October 9, 2016 01:04 AM2016-10-09T01:04:44+5:302016-10-09T01:06:34+5:30

बहुतांशी स्पा सेंटरमधील साधनसामग्री व कर्मचारी गायब असल्याने संशय

Police raids at 19 Massage Center | १९ मसाज सेंटरवर पोलिसांचे छापे

१९ मसाज सेंटरवर पोलिसांचे छापे

Next

नाशिक : स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्रय करण्याचा व्यवसाय दिवसेंदिवस फोफावत चालला आहे़ पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी शुक्रवारी (दि़७) शहरातील गंगापूररोड, कॉलेजरोड, शरणपूररोड आदि भागात सुरू असलेल्या १९ स्पा सेंटरवर अचानक छापे टाकले़ यातील बहुतांशी स्पा सेंटरमधील साधनसामग्री व कर्मचारी गायब असल्याने संशय निर्माण झाला आहे.
दरम्यान, एन्झी स्पा मसाज सेंटरचा मालक संशयित हेमंत परिहार व निलोफर शेख यांच्या कोठडीत न्यायालयाने वाढ केली आहे़
पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त डॉ़ राजू भुजबळ यांनी बुधवारी (दि़५) कॉलेजरोडवरील ठक्कर मॅजेस्टी या व्यावसायिक इमारतीत सुरू असलेल्या एन्झी स्पा- मसाज सेंटरवर छापा टाकला होता़ या स्पाचा मालक, व्यवस्थापिका, ग्राहक व पाच तरुणींना ताब्यातही घेण्यात आले होते़ या घटनेनंतर शहरातील स्पा सेंटरची माहिती घेतल्यानंतर शुक्रवारी एकाचवेळी १९ ठिकाणी छापे टाकण्यात आले़ यामध्ये पोलिसांना केवळ ३-४ सेंटरच सुरू असल्याचे आढळून आले़
कॉलेजरोवरील एन्झी स्पा सेंटरवरील छाप्याच्या दुसऱ्या दिवसानंतर बहुतांशी स्पा सेंटर हे अचानक बंद झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे़ त्यामुळे या सेंटरमध्ये नक्कीच देहविक्र य सुरू असल्याचा पोलिसांचा संशय आहे़ या मसाज सेंटरवर आता पोलिसांची करडी नजर असणार आहे़ दरम्यान, शहरातील उच्चभ्रू परिसरात मोठ्या संख्येने अनधिकृतपणे स्पा सेंटर सुरू असून, त्याठिकाणी ग्रामीण भागातील ग्राहकांची संख्या मोठी असल्याचे समोर आले आहे़ या कारवाईत गंगापूर, पंचवटी, भद्रकाली पोलीस ठाण्यातील महिला व पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते़ (प्रतिनिधी)

Web Title: Police raids at 19 Massage Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.