पोलिसांचा छापा; जनावरांचे अवयव जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 12:58 AM2019-02-07T00:58:22+5:302019-02-07T00:58:42+5:30
मालेगाव : येथील शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कसाबवाडा भागात पोलिसांनी छापा टाकून जनावरांची कत्तल करुन त्याची विक्री करण्यासाठी आणणारे वाहन व मुद्देमाल जप्त केले. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी सकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास कसाबवाडा येथील सार्वजनिक शौचालयाच्या भिंती लगत अवैधरीत्या स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी जनावरांची कत्तल करून त्याचे अवयव धुळे येथून मालेगाव श्हरात विक्रीकरिता आणत असताना महिंद्रा बोलेरो कंपनीची पिकअप क्रमांक एमएच ०२ वायए ५२३८ वरील वाहन चालक-मालक सय्यद यासीन सय्यद आलम रा. बापूगांधी नगर हा मिळून आला. पोलिसांनी कारवाईत ३ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.