ग्रामीणमधील हातभट्ट्यांवर पोलिसांचे छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 01:03 AM2017-08-28T01:03:34+5:302017-08-28T01:03:46+5:30

ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर लक्ष केंद्रित केले असून, त्यासाठी छापामारी सत्र सुरू केले आहे़ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांनी वाडीवºहे, सटाणा व त्र्यंबकेश्वर या ठिकाणी सुरू असलेल्या गावठी दारू तयार करणाºया हातभट्ट्यांवर छापे टाकून सव्वादोन लाखांचा ऐवज जप्त करून नष्ट केला असून, चौघा संशयितांवर गुन्हे दाखल केले आहे़ पोलिसांनी नष्ट केलेल्या साहित्यामध्ये गावठी दारू, रसायनाचा समावेश आहे़

Police raids on assault rifles | ग्रामीणमधील हातभट्ट्यांवर पोलिसांचे छापे

ग्रामीणमधील हातभट्ट्यांवर पोलिसांचे छापे

Next

नाशिक : ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर लक्ष केंद्रित केले असून, त्यासाठी छापामारी सत्र सुरू केले आहे़ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांनी वाडीवºहे, सटाणा व त्र्यंबकेश्वर या ठिकाणी सुरू असलेल्या गावठी दारू तयार करणाºया हातभट्ट्यांवर छापे टाकून सव्वादोन लाखांचा ऐवज जप्त करून नष्ट केला असून, चौघा संशयितांवर गुन्हे दाखल केले आहे़ पोलिसांनी नष्ट केलेल्या साहित्यामध्ये गावठी दारू, रसायनाचा समावेश आहे़ वाडीवºहे पोलीस ठाणे हद्दीतील मुळेगाव रामवाडी शिवारातील नवविभागाच्या जागेतील बोपर नाला परिसरात अवैधरीत्या हातभट्टीची गावठी दारू तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती़ त्यानुसार या ठिकाणी छापा टाकून संशयित भोरू महादू शिद (३५, रा. मुळेगाव रामवाडी, ता त्रंबकेश्वर) यास ताब्यात घेतले, "तर सोमा राम शिद, पिंटू चंदू दोरे हे फरार झाले़ या ठिकाणाहून हातभट्टीची गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे २४०० लिटर रसायन, ५० लिटर तयार दारू, १२ प्लॅस्टिकचे ड्रम असा एकूण १ लाख २८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संबंधितांविरोधात वाडीवºहे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ गुरुळे, सतीश जाधव, चंद्रभान जाधव, पोलीस हवालदार राजू दिवटे, दीपक अहिरे, बंडू ठाकरे, शिवाजी जुंदरे, सुनील पानसरे, अशोक जगताप, नामदेव खैरनार, पोलीस नाईक जालिंदर खराटे, संदीप हांडगे, सचिन पिंगळ, संदीप लगड यांनी ही कारवाई केली़ सटाणा तालुक्यातील जुने शेमळी गाव शिवारातील भाऊराव सोनवणे यांच्या उसाचे शेतात सुरू असलेल्या हातभट्टीवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकला़ या ठिकाणी गावठी दारू तयार करणाºया संशयित ताराबाई मुरलीधर निकम (५५, रा. जुनी शेमळी, ता. सटाणा) हीस ताब्यात घेऊ न १४०० लिटर रसायन, ४० लि. तयार दारू, सात प्लॅस्टिकचे ड्रम असा एकूण ७८ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संबंधित महिलेविरोधात सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ च्स्थानिक गुन्हे शाखेने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील तळेगाव वाढोली रोडवरील तळेगाव शिवारात गावठी दारू तयार करणाºया हातभट्टीच्या ठिकाणी छापा टाकला़ या ठिकाणी संशयित दिनकर भोरूजी निंबेकर (तळेगाव, ता त्रंबकेश्वर) हा गावठी दारू तयार करत होता़ मात्र, पोलिसांची चाहूल लागताच तो फरार झाला असून, या ठिकाणाहून ३५० लिटर रसायन, १० लिटर तयार दारू, ०३ प्लॅस्टिकचे ड्रम असा १७ हजार ६०० मुद्देमाल जप्त केला.असून, त्याच्यावर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Police raids on assault rifles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.