शहरातील जुगार अड्ड्यांवर पोलिसांची छापेमारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 10:53 PM2018-08-31T22:53:25+5:302018-09-01T00:18:13+5:30

गुन्हे शाखेच्या युनिट दोनने इंदिरानगर, नाशिकरोड व सातपूर परिसरातील जुगार अड्ड्यांना लक्ष्य करीत गुरुवारी (दि़ ३०) छापेमारी केली़ या कारवाईत जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रकमेसह  जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़

Police raids on gambling bases in city | शहरातील जुगार अड्ड्यांवर पोलिसांची छापेमारी

शहरातील जुगार अड्ड्यांवर पोलिसांची छापेमारी

Next

नाशिक : गुन्हे शाखेच्या युनिट दोनने इंदिरानगर, नाशिकरोड व सातपूर परिसरातील जुगार अड्ड्यांना लक्ष्य करीत गुरुवारी (दि़ ३०) छापेमारी केली़ या कारवाईत जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रकमेसह  जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़  इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळ जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार सायंकाळी पोलिसांनी छापा टाकला असता संशयित नासीर मेहबूब पठाण (रा. भद्रकाली) व त्याचा साथीदार हे दोघे कल्याण बाजार जुगार खेळवित असताना आढळून आले़ या दोघांकडून जुगाराचे साहित्य व ९४० रुपये जप्त करण्यात आले आहेत़ या दोघांवर इंदिरानगर पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़  नाशिकरोडच्या वास्को चौकातील सुलभ शौचालयाच्या भिंतीजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर बुधवारी (दि. २९) सायंकाळी पोलिसांनी छापा टाकला. यावेळी संशयित बाळू यमाजी मनकूनाईक (रा. देवळाली गाव) हा कल्याण बाजार जुगार खेळविताना आढळून आला. त्याच्याकडून जुगाराचे साहित्य व ४०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली  आहे़ या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये  गुन्हा दाखल करण्यात आला  आहे़  सातपूरच्या ईएसआय हॉस्पिटलमागे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर बुधवारी (दि़ २९) दुपारी पोलिसांनी छापा टाकून एकास अटक केली आहे़ संशयित कैलास छगन दोडके (रा. अंबड लिंक रोड) हा लोकांकडून पैसे घेऊन कल्याण बाजार नावाचा जुगार खेळवित होता़ त्याच्याकडून जुगाराचे साहित्य व ३८० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे़ या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Police raids on gambling bases in city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.