शहरातील तीन जुगार अड्ड्यांवर पोलिसांची छापेमारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 04:54 PM2018-08-18T16:54:49+5:302018-08-18T16:55:47+5:30

नाशिक : पोलीस आयुक्तालयातील भद्रकाली, म्हसरूळ व नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतील जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापेमारी करून आठ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे़ या जुगा-यांकडून रोख रक्कमव जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून, संबंधित पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़

 Police raids on three gambling places in the city | शहरातील तीन जुगार अड्ड्यांवर पोलिसांची छापेमारी

शहरातील तीन जुगार अड्ड्यांवर पोलिसांची छापेमारी

Next
ठळक मुद्देरोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त

नाशिक : पोलीस आयुक्तालयातील भद्रकाली, म्हसरूळ व नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतील जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापेमारी करून आठ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे़ या जुगा-यांकडून रोख रक्कमव जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून, संबंधित पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़

भद्रकाली परिसरातील बागवापु-यातील कादरी मस्जिदजवळील मोकळ्या जागेत मटका जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ शुक्रवारी (दि़१७) दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून कल्याण मटका खेळणारे संशयित सय्यद मुश्ताक अब्दुल रज्जाक ऊर्फ बबलू पटेल (रा. कादरी मस्जिदीशेजारी, बागवानपुरा) यास ताब्यात घेतले़ नागरिकांकडून अंक व आकड्यांवर पैसे लावून तो जुगार खेळत होता. त्याच्याकडून दोन हजार १२० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़

म्हसरूळ गावातील बसस्टॉपशेजारी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर म्हसरूळ पोलिसांनी शुक्रवारी (दि़१७) दुपारी छापा टाकून संशयित सचिन बबन राक्षे (वय २८, रा. वडनगर, म्हसरूळ, नाशिक) व त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले़ पत्र्याच्या शेडमध्ये हे तिघे कल्याण ओपन हा जुगार खेळत होते़ या तिघांकडून दोन हजार ९५० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़ दरम्यान, या तिघांवर म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

नाशिकरोडच्या मालधक्का रोडवरील शौचालयाच्या बाजूस शुक्रवारी (दि़१७) रात्रीच्या सुमारास जुगार खेळणा-या चौघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले़ संशयित आदित्य पराड (रा. गुलाबवाडी, नाशिकरोड) व त्याचे तीन साथीदार पत्त्यांवर अंदर-बाहर नावाचा जुगार खेळत होते़ पोलिसांनी या चौघांकडून ५२० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले असून, त्यांच्यावर नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title:  Police raids on three gambling places in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.