रेझिंग डे निमित्त पोलिसांकडून जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 02:09 PM2020-01-06T14:09:16+5:302020-01-06T14:09:47+5:30
घोटी : विविध कायदे आणि नियमांच्या परिचयातून विदयार्थ्यांना सामाजिक जाणीव निर्माण होते. मात्र असे अवघड विषय बालमनावर बिंबवण्यासाठी विविध क्र ीडा स्पर्धा आवश्यक आहेत असे प्रतिपादन वाडीवर्हे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांनी केले.
घोटी : विविध कायदे आणि नियमांच्या परिचयातून विदयार्थ्यांना सामाजिक जाणीव निर्माण होते. मात्र असे अवघड विषय बालमनावर बिंबवण्यासाठी विविध क्र ीडा स्पर्धा आवश्यक आहेत असे प्रतिपादन वाडीवर्हे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांनी केले. पोलीस ठाण्यातर्फे पोलीस रेझिंग डे निमित्ताने गोंदे दुमाला येथील सिद्धिविनायक माध्यमिक विद्यालयात झालेल्या कार्यक्र माप्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी विविध क्र ीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये कबड्डी, चमचा लिंबू, गोळा फेक, लांब उडी, खो खो आदी स्पर्धा घेण्यात आल्या. मान्यवरांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले. पोलीस ठाण्यातर्फेजनजागृती म्हणून विद्यार्थ्यांना वाहतुक नियमांची सखोल माहिती देण्यात आली. हेल्मेटचा फायदा आणि सक्ती, सीट बेल्टमुळे होणारे फायदे, ट्रिपल सीटचे तोटे, मोटार अपघात आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्र माप्रसंगी वाहतूक पोलीस हवालदार बबन सोनवणे, गोपनीय कर्मचारी सोमनाथ बोराडे, मुख्याध्यापक पाटील आदी उपस्थित होते.