पोलीस कुटुंबियांचा विश्वास उंचावतोय : महासंचालक सतीश माथुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 10:41 PM2018-06-23T22:41:02+5:302018-06-23T22:42:35+5:30

निमित्त होते, पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शनिवारी (दि.२३) गंगापूररोडवरील शंकराचार्य सभागृहात आयोजित ‘झेप उज्ज्वल भविष्याकडे’ या कर्यक्रमाचे

The police is raising the confidence of the family: Director General Satish Mathur | पोलीस कुटुंबियांचा विश्वास उंचावतोय : महासंचालक सतीश माथुर

पोलीस कुटुंबियांचा विश्वास उंचावतोय : महासंचालक सतीश माथुर

Next
ठळक मुद्देकौटुंबिक सहलीच्या वाहनाला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.७० गुणवंत पाल्यांना पोलीस महासंचालकांच्या हस्ते गौरविण्यात आले.

नाशिक : राज्यासह नाशिकमध्ये पोलीस दलासह त्यांच्या कुटुंबियांच्या सर्वांगिण विकासासाठी पोलीस दलाकडून राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांमुळे पोलिसांच्या कुटुंबियांचा विश्वास उंचविण्यास मदत होत आहे. नाशिक पोलीस आयुक्तालयाकडून विविध समाजपयोगी उपक्रमांसह पोलीसांकरिताही आगळेवेगळे उपक्रम सातत्याने राबविले जात असून यामुळे पोलीस दलाची मानसिकता भक्कम होण्यासाठी निश्चित हातभार लागत असल्याचे प्रतिपादन राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी केले.
निमित्त होते, पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शनिवारी (दि.२३) गंगापूररोडवरील शंकराचार्य सभागृहात आयोजित ‘झेप उज्ज्वल भविष्याकडे’ या कर्यक्रमाचे. याप्रसंगी माथुर प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. यावेळी व्यासपिठावर विशेष पोलीस महानिरिक्षक छेरिंग दोरजे, औरंगाबादचे पोलीस आयुक्त चिरंजीवप्रसाद, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल, पोलीस अधिक्षक संजय दराडे, महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या संचालक अश्वती दोरजे, महिला व बालविकास राज्य सचिव श्रीमती विनिता सिंगल, रोहिणी दराडे आदि उपस्थित होते. यावेळी उपआयुक्त माधुरी कांगणे यांनी आयुक्तालयाच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध पोलीस कल्याण कार्यक्र माचे सादरीकरण केले. तसेच शहर व ग्रामीण पोलीस दलातील पोलिसांच्या दहावी-बारावीच्या परिक्षेमध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या सुमारे ७० गुणवंत पाल्यांना पोलीस महासंचालकांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच विविध क्षेत्रांमध्ये प्राविण्य मिळवून उज्ज्वल कामगिरी करणाºया पोलिस अधिकारी-कर्मचा-यांच्या पाल्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने रविजा सिंगल तसेच किरणकुमार जाधव यांचा समावेश होता. प्रारंभी माथुर यांचा सन्मानपत्र व रेखाचित्राची भेट देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान, शिर्डी दर्शनासाठी निघालेल्या शहरातील विविध पोलीस अधिकारी-कर्मचा-यांच्या कौटुंबिक सहलीच्या वाहनाला हिरवा झेंडा महासंचालक सतीश माथुर यांच्या हस्ते दाखविण्यात आला. प्रास्ताविक उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी केले. सुत्रसंचालन सहायक आयुक्त सचीन गोरे यांनी केले व आभार उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी मानले.

Web Title: The police is raising the confidence of the family: Director General Satish Mathur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.