बनावट नोटांप्रकरणी पाचही संशयितांना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 09:15 PM2021-10-14T21:15:55+5:302021-10-14T21:17:10+5:30

लासलगाव : पाचशे रूपयांच्या २९१ बनावट चलनी नोटा व्यवहारात आणणाऱ्या महिला डॉक्टरसह पाच संशयित आरोपींना लासलगाव पोलिसांनी शुक्रवारी (दि. १४) न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायाधीश एस. बी. काळे यांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, अन्य संशयितांच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे.

Police remand all five suspects in counterfeit notes case | बनावट नोटांप्रकरणी पाचही संशयितांना पोलीस कोठडी

बनावट नोटांप्रकरणी पाचही संशयितांना पोलीस कोठडी

Next
ठळक मुद्देलासलगाव : संशयितांच्या शोधार्थ पोलीस पथक रवाना

लासलगाव : पाचशे रूपयांच्या २९१ बनावट चलनी नोटा व्यवहारात आणणाऱ्या महिला डॉक्टरसह पाच संशयित आरोपींना लासलगाव पोलिसांनी शुक्रवारी (दि. १४) न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायाधीश एस. बी. काळे यांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, अन्य संशयितांच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे.
पाचशे रुपयांच्या २९१ बनावट चलनी नोटा व्यवहारात आणणाऱ्या टोळीचा लासलगाव पोलिसांनी बुधवारी (दि. १३) पर्दाफाश करत एका महिला डॉक्टरसह पाचजणांना अटक केली होती. त्यात मोहन बाबुराव पाटील व डॉ. प्रतिभा बाबुराव घायाळ (दोघे रा. बोराडे हॉस्पिटलजवळ) व विठ्ठल चंपालाल नाबरीया (रा. कृषीनगर, कोटमगाव रोड, लासलगाव, ता. निफाड) तसेच रवींद्र हिरामण राऊत (रा. स्मारक नगर पेठ, ता. पेठ, जि. नाशिक) व विनोद मोहन पटेल (रा. पंचवटी, नाशिक) यांना ताब्यात घेण्यात आले होते.

या संशयितांकडून १ लाख ४५ हजार रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या होत्या. याशिवाय कारही जप्त करण्यात आली होती. या संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी दिली. दरम्यान, संशयित व्यक्तींचा शोध घेण्याकरिता लासलगावचे पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे यांच्यासह पोलीस पथक रवाना झाले आहे.

Web Title: Police remand all five suspects in counterfeit notes case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.