पोलिसांकडून विमानतळ सुरक्षाव्यवस्थेचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 01:17 AM2018-10-21T01:17:02+5:302018-10-21T01:18:19+5:30
राष्ट्रपती रामनाथ कोविंंद यांच्या सोमवारच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी ओझर विमानतळावर पोलिसांनी सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला, तर हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने मांगीतुंगी येथे रंगीत तालीम केली.
नाशिक : राष्ट्रपती रामनाथ कोविंंद यांच्या सोमवारच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी ओझर विमानतळावर पोलिसांनी सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला, तर हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने मांगीतुंगी येथे रंगीत तालीम केली. यावेळी महसूल अधिकाºयांनीही हजेरी लावली.
जैन धर्मगुरु भगवान ऋषभदेव महाराज यांच्या मांगीतुंगी येथील तीर्थस्थळी सोमवारी विश्वशांती संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, त्यासाठी राष्टÑपती रामनाथ कोविंद, राज्यपाल सी. विद्यासागरराव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाचारण करण्यात आले आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्ती या सोहळ्यासाठी हजेरी लावणार असल्याने त्यादृष्टीने तयारी केली जात असून, राष्टÑपतींचे सोमवारी दुपारी विशेष विमानाने ओझर विमानतळावर आगमन होईल व तेथून ते हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने मांगीतुंगी येथे रवाना होतील.
राष्टÑपती कार्यक्रमाला येणार असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेची काटेकोर काळजी घेण्यात येत असून, त्यासाठी दिल्लीहून विशेष सुरक्षा पथक तसेच राज्यातील विशेष सुरक्षा पथकाचे अधिकारी दाखल झाले आहेत. शनिवारी सकाळी ओझर विमानतळावर राज्याचे विशेष सुरक्षा महानिरीक्षक कृष्णप्रकाश, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन, पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान राष्टÑपतींसाठी हवाई दलाच्या दोन हेलिकॉप्टरचे ओझरला आगमन झाले. त्यातील एका हेलिकॉप्टरने मांगीतुंगी येथे भेट देऊन हवाई मार्गाची पाहणी केली.
जिल्हा प्रशासनाकडे राष्ट्रपतींचा मिनिट टू मिनिट कार्यक्रम प्राप्त झाला असून, त्यानुसार दुपारी पावणे दोन वाजता राष्टÑपतींचे ओझरला आगमन होईल. तत्पूर्वी पाच मिनिटांच्या अंतराने मुख्यमंत्री, राज्यपाल यांचे विमानाने आगमन होणार आहे. राष्टÑपती आल्यानंतर हवाई दलाच्या विमानाने ते मांगीतुंगी येथे रवाना होतील.
साधारणत: साडेपाच वाजता राष्टÑपती मांगीतुंगीहून ओझरला व तेथून पुण्याकडे रवाना होणार आहेत. या दौºयासाठी सुमारे ४० शासकीय वाहनांचा ताफा असणार आहे.