पोलिसांच्या मध्यस्थीने कंत्राटी कामगारांचे ठिय्या आंदोलन स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 06:28 PM2020-07-02T18:28:05+5:302020-07-02T18:29:03+5:30
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला औद्योगिक वसाहतीतील वीर इलेक्ट्रो इंजिनिअरींग कंपनीमध्ये आठ कामगार कंत्राटी पद्धतीने काम करत असून गेल्या तीन महीन्यांपासुन या आठ कामगारांना कंपनीकडून कंत्राट संपल्याच्या नावाखाली कामावरून कमी करण्यात आले होते.
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला औद्योगिक वसाहतीतील वीर इलेक्ट्रो इंजिनिअरींग कंपनीमध्ये आठ कामगार कंत्राटी पद्धतीने काम करत असून गेल्या तीन महीन्यांपासुन या आठ कामगारांना कंपनीकडून कंत्राट संपल्याच्या नावाखाली कामावरून कमी करण्यात आले होते. यामुळे या कामगारांचा रोष अनावर झाल्यामुळे या कामगारांनी कंपनीच्या प्रवेशद्वारावरच आपल्या कुटुंबासह निदर्शने करत सकाळपासूनच ठिय्या मांडून बसले होते.
गोंदे दुमाला येथील वीर इलेक्ट्रो कंपनीच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडून बसल्याने कंपनी प्रशासनाने वाडिवºहे पोलिसांना माहती दिली. त्यानंतर पोलिस, कंपनी प्रशासन व कामगार यांच्यामध्ये बैठक होऊन या बैठकीमध्ये कंपनी कडुन लेखी करार करु न दोन कामगारांना शक्रवार (दि.३) पासुन कामावर घेण्याचे ठरले असून उर्वरीत सहा कामगारांना १ आॅगस्ट पासुन कामावर घेण्याचे लेखी आश्वासन देण्यात आल्याचे सिटूचे जिल्हा सरचिटणीस देविदास आडोळे यांनी माहिती देतांना सांगितले.
वाडिवºहे पोलिसांना पाचारण करण्यात आल्यानंतर या कंपनीच्या प्रवेशद्वारावर काही काळ तणाव निर्माण झाला होता. परंतू पोलिसांच्या मध्यस्थीने या वादावर तोडगा काढण्यात आला असून कामगारांनी देखील या निर्णयाला मान्यता दिली असल्याचे उपस्थित कामगारांनी सांगितले.
यावेळी सीटुचे मनोज भोर, विठोबा कातोरे, अशोक कदम, भाउसाहेब जाधव, मच्छिंद्र गतीर आदींसह कामगारांचे कुटुंबीय उपस्थित होते.