निफाड शहरात पोलिसांचा रूट मार्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 11:14 PM2021-04-20T23:14:28+5:302021-04-21T00:37:31+5:30
निफाड : शहरात कोरोनाच्या काळात नागरिकांनी रस्त्यावर गर्दी करू नये, मास्कचा वापर करावा , कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे याबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने निफाड पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रंगराव सानप यांच्या नेतृत्वाखाली शहरात रूट मार्च काढण्यात आला होता.

रूट मार्चची सुरुवात निफाड पोलीस ठाण्यापासून झाली. हा रूट मार्च छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ,मामलेदार चौक, उपजिल्हा रुग्णालय रोड, उगाव रोड,शांतीनगर त्रिफुली या मार्गाने काढण्यात आला. रूट मार्च शहरातून जात असताना नागरिकांनी रस्त्यावर विनाकारण गर्दी करु नये, मास्कचा वापर करावा, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करावे या सूचना ध्वनिक्षेपकावरून नागरिकांसाठी दिल्या जात होत्या. रूट मार्च मध्ये पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार यांचेसह १७ पोलीस अंमलदार, पोलीस मुख्यालय अखिल स्टायकिंग फोर्स, १५ होमगार्ड सहभागी झाले होते.