त्र्यंबकेश्वरला पोलिसांचा रुटमार्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:14 AM2021-05-11T04:14:25+5:302021-05-11T04:14:25+5:30
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा आलेख थोड्या प्रमाणात घसरत असला तरी ग्रामीण भागात अजूनही त्याचा प्रादुर्भाव म्हणावा तसा कमी झालेला नाही. ...
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा आलेख थोड्या प्रमाणात घसरत असला तरी ग्रामीण भागात अजूनही त्याचा प्रादुर्भाव म्हणावा तसा कमी झालेला नाही. शासनाने १५ मेपर्यंत कडक निर्बंध लागू केलेले आहेत. तसेच मंदिरे तथा धार्मिक स्थळेही बंद करण्यात आली आहेत. सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत फक्त चार तास किराणा आणि भाजीबाजार सुरू असतो. यावेळेतच उदरनिर्वाहासाठी खरेदी करण्यात येते. मात्र, खरेदीसाठी लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असल्याने कोरोनाविषयक नियमांचा भंग होत आहे. त्यासाठी त्र्यंबक पोलिसांनी रुटमार्च काढत शक्तिप्रदर्शन केले. पोलीस ठाण्याचे ४ अधिकारी व ३० कर्मचारी तसेच आरसीटीचे पथक या रुटमार्चमध्ये सहभागी झाले होते.
फोटो- १० त्र्यंबक पोलीस
===Photopath===
100521\10nsk_23_10052021_13.jpg
===Caption===
फोटो- १० त्र्यंबक पोलीस