कळवण पोलिसांकडून २८४ दुचाकी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 07:32 PM2020-04-28T19:32:21+5:302020-04-28T19:32:53+5:30
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दि. २२ मार्चपासून ३ मेपर्यंत देशभरात लॉकडाउन सुरु असून या काळात कळवण पोलिसांनी २८४ दुचाकी जप्त करु न ८३ हजाराची दंड आकारणी केली आहे. दरम्यान, गावठी दारु तयार करणे व विक्र ी करणा-या १० जणांवर गुन्हे दाखल करून ८४ हजार रु पयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून पोलीस कारवाईचे स्वागत केले आहे.
कळवण : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दि. २२ मार्चपासून ३ मेपर्यंत देशभरात लॉकडाउन सुरु असून या काळात कळवण पोलिसांनी २८४ दुचाकी जप्त करु न ८३ हजाराची दंड आकारणी केली आहे. दरम्यान, गावठी दारु तयार करणे व विक्र ी करणा-या १० जणांवर गुन्हे दाखल करून ८४ हजार रु पयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून पोलीस कारवाईचे स्वागत केले आहे.
सध्या लॉकडाऊन कालावधी सुरु असून पोलीस यंत्रणा आपले कर्तव्य बजावत असून कोरोना विषाणूचे गांभीर्य नसलेल्या नागरिकांवर शासनाच्या आदेशाचे उल्लघंन केल्याप्रकरणी कळवण पोलिसांनी कारवाई करत अनेकांवर गुन्हे दाखल केले असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाशी संघर्ष करून या रोगाचा फैलाव होऊ नये यासाठी केंद्र व राज्य शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. पोलिस प्रशासनाकडून वारंवार करण्यात आलेल्या आवाहनाला न जुमानता संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी १८८ प्रमाणे ५५ जणांवर ३३ गुन्हे दाखल केले आहेत . तसेच लॉकडाऊन कालावधीत बेकायदेशीर गावठी दारु तयार करणे व विक्र ी करणा-या १० जणांवर गुन्हे दाखल करून ८४ हजार रु पयांचा मुद्देमाल जप्त केला आहे .
संचारबंदी काळात रस्त्यावर विनाकारण फिरणा-या वाहनचालकांच्या २८४ दुचाकी व ६ चारचाकी वाहने जप्त करून ८३ हजार रु पयांचा दंड वसूल केला आहे .पोलीस प्रशासनाने सौजन्याची व सहकार्याची भूमिका घेऊन अत्यावश्यक कामांसाठी सवलत दिलेली आहे. तरीही लोक हेतूपुरस्कर कायद्याचे उल्लंघन करून कारवाई करण्यास प्रवृत्त करीत आहेत . पोलीस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे ,पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निकम, सोनवणे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक घोडे, पोलीस हवालदार मधुकर तारु , निकम, कडाळे, रायसिंग जाधव ,सचिन राऊत, शिवाजी शिंदे, सुरेश पवार पथकाने कारवाईत सहभाग घेत कायद्याचे पालन न करणा-यांवर कारवाई केली आहे.