कळवणला पोलिसांकडून ५० वाहने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 10:29 PM2020-04-09T22:29:57+5:302020-04-09T23:13:16+5:30
कोरोनाचा प्रकोप झपाट्याने वाढत असतानाच कळवणकर मात्र रस्त्यावर विनाकारण फिरत असल्याने त्यांची वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. कोणीही विनाकारण रस्त्यावर दिसले किंवा मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडणाºयांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी सांगितले.
कळवण : कोरोनाचा प्रकोप झपाट्याने वाढत असतानाच कळवणकर मात्र रस्त्यावर विनाकारण फिरत असल्याने त्यांची वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. कोणीही विनाकारण रस्त्यावर दिसले किंवा मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडणाºयांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी सांगितले.
संचारबंदीच्या कालावधीत घराबाहेर पडणाºया लोकांची दुचाकी, चारचाकी वाहने जप्त करण्याच्या कारवाईला शहरात सुरु वात झाली असून, ५० वाहने जप्त करण्यात आली आहेत. कळवण शहरातील सर्वच प्रमुख चौकात, रस्त्यांवर नाकाबंदी करून वाहने अडविण्यात येत आहेत. सर्व वाहने जप्त करण्यात येत असून ती लॉकडाउननंतरच सोडण्याचा पोलिसांचा विचार आहे. कोरोना विषाणूची साखळी मोडून काढण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. नागरिकांची रस्त्यावर होणारी गर्दी पाहता खासगी वाहने रस्त्यावर आणण्यासही बंदी घालण्यात आली आहे. मात्र, असे असले तरी अनेकजण आपली वाहने घेऊन रस्त्यावर येत असून, बाजारपेठेतही गर्दी करीत आहेत. वारंवार सूचना देऊनही वाहनचालक ऐकत नसल्याने बुधवारी सकाळी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, उपनिरीक्षक सोनवणे, निकम यांच्यासह कर्मचाºयांनी शहरातील प्रमुख चौक, मार्गावर वाहनचालकांची कसून चौकशी सुरू केली. घराबाहेर फिरण्याचे कारण योग्य असेल तरच संबंधितांना सोडले जात होते. जे विनाकारण फिरत आहेत. त्यांची वाहने जप्त करण्यास सुरुवात करण्यात आली आहेत. अन्यथा संचारबंदी कायद्याचे उल्लंघन करणाºया नागरिकांवर कारवाईचा इशारा पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिला आहे.
संचारबंदीचा आदेश लागू असताना मॉर्निंग वॉकला जाण्याचे प्रमाण अद्याप कायम असून, त्यांना रोखण्यासाठी गुड मॉर्निंग पथक तैनात करण्यात येणार आहे. रस्त्यावर वॉकिंगसाठी आलेल्या नागरिकांवर या पथकामार्फत कारवाई केली जाणार आहे.