वणीत पोलिसांकडून बंदोबस्त; ग्रामपालिकेकडून जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 17:58 IST2020-03-24T17:58:34+5:302020-03-24T17:58:58+5:30
वणी : महाराष्ट्रात कोरोनाचे रु ग्ण वाढत असल्याची दखल घेत येथे शासकीय आदेशाची कडक अंमलबजावणी सुरु असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस यंत्रणेने कडक कारवाई आरंभली आहे. दरम्यान, वणी ग्रामपालिकेकडून जनजागृती केली जात आहे.

वणीत पोलिसांकडून बंदोबस्त; ग्रामपालिकेकडून जनजागृती
जमावबंदी काळात कोणतेही काम नसताना घराबाहेर पडणे व शासकीय आदेशाच्या पालनाबाबत उदासीनता दाखविणाऱ्यांना कडक कारवाईबाबत सुचीत करु नही त्याकडे दुर्लक्ष करणाºया काही उपद्रवी घटकांना यंत्रणेने दणका दिला आहे. त्यामुळे शहरात तसेच शहराबाहेरील येणारे -जाणारे तसेच वाहनचालकही धास्तावले आहेत. जीवनावश्यक बाबी अंतर्गत येणाºया व्यापाºयांना किमान एक मीटरपेक्षा जास्त अंतरावरु न ग्राहकांना सेवा देण्याबाबत सुचित करण्यात आले असून यासाठी सकाळी ८ ते १२ आणि दुपारी ४ ते ८ वाजेपर्यंतची मुभा देण्यात आली आहे. मंगळवारचा आठवडे बाजार बंद असल्याच्या वेळोवेळी सूचना प्रशासनाने दिल्या होत्या त्यास प्रतिसाद मिळाला. बाजारतळात ये- जा करणाºयांना पिटाळण्यात आले. ग्रामपालीकेकडुन दिवसभर जनजागृतीसाठी भोंग्यावर सुचना देणारे वाहन फिरविण्यात येत होते. दरम्यान, वणी -सापुतारा, वणी- पिंपळगाव, वणी- नाशिक, वणी- कळवण रस्त्यावर शांतता दिसून आली.