समाजासाठी पोलिसांचे आरोग्य उत्तम असावे : जगन्नाथ दीक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:38 AM2019-04-18T00:38:25+5:302019-04-18T00:39:04+5:30

समाजाच्या सुरक्षिततेची जबाबदारी पेलणाऱ्या ‘खाकी’ने स्वत:चे आरोग्यही उत्तम राखणे गरजेचे आहे. पोलिसांचे आरोग्य उत्तम असेल तरच समाजाचे स्वास्थ्य टिकेल, असे सांगत डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी उत्कृष्ट निरामय आरोग्यासाठी आपल्या खास ‘डायट प्लॅन’द्वारे पोलिसांना धडे दिले.

Police should be good for society: Jagannath Dixit | समाजासाठी पोलिसांचे आरोग्य उत्तम असावे : जगन्नाथ दीक्षित

समाजासाठी पोलिसांचे आरोग्य उत्तम असावे : जगन्नाथ दीक्षित

Next

नाशिक : समाजाच्या सुरक्षिततेची जबाबदारी पेलणाऱ्या ‘खाकी’ने स्वत:चे आरोग्यही उत्तम राखणे गरजेचे आहे. पोलिसांचे आरोग्य उत्तम असेल तरच समाजाचे स्वास्थ्य टिकेल, असे सांगत डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी उत्कृष्ट निरामय आरोग्यासाठी आपल्या खास ‘डायट प्लॅन’द्वारे पोलिसांना धडे दिले.
पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांचे वाढते वजन व सुटलेले पोट तसेच आजार रोखण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात विनासायास वेटलॉस व मधुमेह प्रतिबंध या विषयावर डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात दीक्षित बोलत होते. यावेळी दीक्षित म्हणाले, जगामध्ये अनेक डाएट प्लॅन आले आहेत. ज्या प्लॅनने तुमचे वजन कमी होते, पोटाचा घेर कमी होतो व तीन महिन्यांच्या सरासरीने मधुमेह व फास्टिंग इन्शुलीन कमी होते, तो डाएट प्लॅन उत्कृष्टच आहे. आम्ही संशोधन करून असाच प्लॅन तयार केला असून, तो कोणतीही सर्वसामान्य व्यक्ती कोणत्याही वयात सहज पाळू शकते व त्याद्वारे सुदृढ राहू शकते. यामध्ये दिवसभरात ५५ मिनिटांत दोन वेळा जेवावे, ४५ मिनिटं पायी चालण्याचा व्यायाम करावा, मधल्या वेळात भूक लागली तर ताक, ब्लॅक टी, ग्रीन टी, नारळपाणी घेण्यास हरकत नाही. अथवा एखादा टमाटा खाऊ शकता. असा अगदी सोपा डाएट असून, नोंंदणी करून सर्वांनी तो पाळावा, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांना या ताणतणावाच्या स्थितीत आहारशैली व पथ्ये पाळून आरोग्य सांभाळण्याचा सल्ला दिला. याप्रसंगी पोलीस उपायुक्त अमोल तांबे, पौर्णिमा चौघुले, माधुरी कांगणे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी केले.

Web Title: Police should be good for society: Jagannath Dixit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.