गुन्हेच घडू नयेत यासाठी पोलिसांनी आपला प्रभाव निर्माण करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 08:58 PM2021-02-08T20:58:28+5:302021-02-09T00:33:47+5:30
येवला : चांगल्या लोकांचे रक्षण करणे आणि वाईट लोकांवर कारवाई करणे ही पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे, ती यशस्वीपणे पार पाडावी तसेच गुन्हेच घडू नयेत त्यासाठी आपला प्रभाव पोलिसांनी निर्माण करावा, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
येवला : चांगल्या लोकांचे रक्षण करणे आणि वाईट लोकांवर कारवाई करणे ही पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे, ती यशस्वीपणे पार पाडावी तसेच गुन्हेच घडू नयेत त्यासाठी आपला प्रभाव पोलिसांनी निर्माण करावा, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
येवला प्रशासकीय संकुलातील तालुका पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे लोकार्पण भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भुजबळ म्हणाले की, नाशिक जिल्हा शेतीव्यवसायत अग्रेसर जिल्हा आहे. यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठी फसवणूक व्यापारीवर्गाकडून होत होती. त्यावर विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी कारवाई केल्याने शेतकरी समाधानी झाले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विकास कामे थांबली होती. मात्र येवला मतदारसंघात विकासकामे अविरत सुरू राहिले हे विशेष आहे. पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर म्हणाले की, या वास्तूतून शोषित पीडित समाजाला न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त करतो.
कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, समरसिंग साळवे, प्रांत अधिकारी सोपान कासार, तहसीलदार प्रमोद हिले, सार्वजनिक बांधकाम अधीक्षक अभियंता शरद राजभोर, कार्यकारी अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपकार्यकारी अभियंता सागर चौधरी, पोलीस निरीक्षक संदीप कोळी, सहायक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, जिल्हा परिषद सभापती संजय बनकर, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, राधाकिसन सोनवणे, अंबादास बनकर, अरुण थोरात, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, उपनगराध्यक्ष सुरज पटणी उपस्थित होते. प्रास्ताविक अधीक्षक अभियंता शरद राजभोज यांनी केले. आभार पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी मानले.
अशी आहे पोलीस स्टेशन इमारत
येवला शहरात विखुरलेल्या स्वरूपात अडगळीच्या ठिकाणी व अपुऱ्या जागेत तालुका पोलीस स्टेशन कार्यान्वित आहे. नागरिकांच्या सोयीसाठी व प्रभावी प्रशासनासाठी या प्रशाकीय संकुलात तालुका पोलीस स्टेशन इमारत बांधण्यात आली आहे. इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे १ कोटी ३३ लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. या इमारतीचे सर्वसाधारण चटई क्षेत्रफळ-४२५० चौ.फूट इतके आहे. यामध्ये मुख्य पोलीस स्टेशन इमारतीमध्ये तपासणी अधिकारी कक्ष, महिला कॉन्स्टेबल कक्ष, एस. एच. ओ. कक्ष, सशस्त्र खोली, पुरुष व महिला लॉकअप, प्रसाधनगृह, तपासणी कक्ष, संगणक कक्ष , रेकॉर्ड रुम, दिव्यांगासाठीचा रॅम्प तसेच इतर सोयी-सुविधा असणार आहेत.