पोलिसांनी निरोगी राहून कार्यक्षमता वाढवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:14 AM2021-01-23T04:14:53+5:302021-01-23T04:14:53+5:30

परिमंडल दोन विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या नाशिक रोड पोलीस ठाण्यातील सभागृहात झालेल्या कौतुक ...

The police should stay healthy and increase efficiency | पोलिसांनी निरोगी राहून कार्यक्षमता वाढवावी

पोलिसांनी निरोगी राहून कार्यक्षमता वाढवावी

Next

परिमंडल दोन विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या नाशिक रोड पोलीस ठाण्यातील सभागृहात झालेल्या कौतुक सोहळ्यात पाण्डेय बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पोलीस उपायुक्त विजय खरात, अमोल तांबे, पोर्णिमा चौगुले, सहायक आयुक्त समीर शेख, मोहन ठाकूर, अशोक नखाते, प्रदीप जाधव, दीपाली खन्ना, शांताराम गायकवाड, नवलनाथ तांबे आदी मान्यवर उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, मानसिक ताण नसेल, तरच उत्तम कामगिरी करता येते. आपले काम चांगली सेवा देण्यासाठी असावे. त्यासाठी जे करावे लागते ते करणे आपली जबाबदारी आहे. पोलीस हे सेवेत दाखल होतात, तेव्हा त्यांच्यात काही करून दाखविण्याची उमेद असते, परंतु अनुभव नसतो. रोगी माणसांकडून सेवेची अपेक्षा ठेवता येत नाही. अंमलदार, लिपिकसह सर्व अधिकारी, कर्मचारी रोगमुक्त व्हावे, यासाठी उपाययोजना सुरू आहे. पोलिसांच्या कुटुंबाचेही कल्याण होईल, यासाठी आयुक्तालयाने पुढाकार घेतला आहे. पोलिसांच्या मुलांची, त्यांच्या शिक्षणाची काळजी घेण्यात येणार आहे. महिला पोलीस कर्मचारी विविध जबाबदाऱ्यांसाठी पुढे येत आहेत. महिला पोलिसांनी टवाळखोरांवर कारवाई करून आदर्श निर्माण केल्याचे गौरवोद्गार पाण्डेय यांनी काढले.

यावेळी परिमंडल दोनमधील पोलीस ठाण्यतील विविध गुन्ह्यांचा तत्काळ व चतुराईने तपास करणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा प्रशस्तिपत्र व फूल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारार्थी पोलीस अधिकारी, कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी केले. सूत्रसंचालन सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते व आभार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी मानले. यावेळी नाशिक रोड, उपनगर, देवळाली कॅम्प, इंदिरानगर, सातपूर, अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (फोटो २२ पोलीस)

Web Title: The police should stay healthy and increase efficiency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.