सैन्यातील जवानांकडून पोलीस शिपायाचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 01:01 AM2020-01-18T01:01:21+5:302020-01-18T01:08:58+5:30

नाशिक : भद्रकालीतील खडकाळी सिग्नलवर मध्य रात्रीच्या सुमारास गस्तीवर असलेल्या पोलीस हवालदारास सैन्याच्या दोन जवानांनी अपहरण करून मारहाण केल्याचा ...

Police soldier abducted by army personnel | सैन्यातील जवानांकडून पोलीस शिपायाचे अपहरण

सैन्यातील जवानांकडून पोलीस शिपायाचे अपहरण

Next
ठळक मुद्देसरकारी कामात अडथळा : कर्तव्यावरील कर्मचाऱ्यास मारहाण




नाशिक : भद्रकालीतील खडकाळी सिग्नलवर मध्य रात्रीच्या सुमारास गस्तीवर असलेल्या पोलीस हवालदारास सैन्याच्या दोन जवानांनी अपहरण करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणात सैन्याचा सुभेदार व निवृत्त सुभेदार अशा दोघांवर भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरावाडीत राहणारे सैन्याचे सेवानिवृत्त सुभेदार रोहित प्रल्हाद दापूरकर (४३), देवळाली येथील आर्टिलरी सेंटरमधील सैन्याचे सुभेदार व मन्ना डे (४३)मध्यरात्री सव्वाएक वाजेच्या सुमारास खडकाळी सिग्नल येथे सारडा सर्कलकडून शालीमारच्या दिशेने वाहन उभे करून थांबलेले होते. त्यांना कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई दीपक सखाराम पाटील (ब. नं.४१) शासकीय कर्तव्य बजावत विचारपूस केली. त्याचा राग येऊन सैन्याच्या या दोन्ही जवानांनी त्यांना मारहण केली. त्यामुळे दीपक पाटील यांनी त्यांना पोलीस ठाण्यात चला, असे सांगितले. परंतु जवानांनी दीपक पाटील यांना गाडीत बसवून देवळालीच्या दिशने घेऊन गेले. दरम्यान, पोलिसांनी या घटनेत जवानांनी वापरलेले जे.एच.१ सीजी २६९८ क्रमांकाचे चारचाकी वाहनही हस्तगत केले आहे.
दीपक पाटील यांनी शहर पोलिसांना या घटनेची वायरलेस यंत्रणेद्वारे माहिती दिली असता पोलिसांनी तत्काळ शहरात नाकाबंदी करून संबंधित गाडी नाशिकरोड परिसरात अडवून दोन्ही जवानांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणण्यासोबतच मारहाण व अपहरणाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Web Title: Police soldier abducted by army personnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.