पोलीस उपनिरीक्षकाच्या बँक खात्यातून १२ लाखांची रोकड लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 01:14 AM2018-12-15T01:14:51+5:302018-12-15T01:15:07+5:30

त्र्यंबकरोडवरील महाराष्ट्र पोलीस अकादमीतील प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाच्या बँक खात्यातून सव्वादोन वर्षांच्या कालावधीत ११ लाख ९० हजार रुपये परस्पर काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या फसवणुकीत महाराष्ट्र पोलीस अकादमी वा आयडीबीआय बँकेतील कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याचा संशय गंगापूर पोलिसांनी व्यक्त केला असून, याप्रकरणी फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे़

The police sub-inspector's bank account will have 12 lakh rupees | पोलीस उपनिरीक्षकाच्या बँक खात्यातून १२ लाखांची रोकड लांबविली

पोलीस उपनिरीक्षकाच्या बँक खात्यातून १२ लाखांची रोकड लांबविली

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्र पोलीस अकादमी : मोबाइल क्रमांकात बदल करून फसवणूक

नाशिक : त्र्यंबकरोडवरील महाराष्ट्र पोलीस अकादमीतील प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाच्या बँक खात्यातून सव्वादोन वर्षांच्या कालावधीत ११ लाख ९० हजार रुपये परस्पर काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या फसवणुकीत महाराष्ट्र पोलीस अकादमी वा आयडीबीआय बँकेतील कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याचा संशय गंगापूर पोलिसांनी व्यक्त केला असून, याप्रकरणी फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे़
गंगापूर पोलीस ठाण्यात भरत केशवराव हुंबे (रा. नांदूर नाका रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महाराष्ट्र पोलीस अकॅडमीत अडीच ते तीन वर्षांपूर्वी दुष्यंत दादासाहेब पाटील हे प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्तीस होते. काही महिन्यांपूर्वीच पोलीस खात्यातील नोकरी सोडलेल्या पाटील यांचा त्यावेळचा दरमहा पगार व इतर भत्ते त्यांच्या आयडीबीआय बँकेतील सेव्हिंग खाते क्रमांक ०१०३१०४०००२७४१११ मध्ये जमा होत होता़
पोलीस उपनिरीक्षक पाटील हे एमपीएतील नोकरी सोडून गेलेले असल्याने आपली फसवणूक झाल्याचे बºयाच कालावधीनंतर त्यांच्या लक्षात आले. एमपीएममध्ये असताना दुष्यंत पाटील यांची कागदपत्रे व कार्ड तिथेच राहिले होते. याचाच गैरफायदा घेत रक्कम काढून घेत फसवणूक करण्यात आली आहे़ यापद्धतीने आणखी पोलीस अधिकाºयांची फसवणूक झाली आहे का, या दृष्टीनेही गंगापूर पोलीस तपास करीत आहेत़
वेगवेगळ्या तारखेला काढली रक्कम
च्महाराष्ट्र पोलीस अकादमीतील संशयित अज्ञात लिपिक वा आयडीबीआय बँकेतील एखाद्या कर्मचाºयाने २८ एप्रिल २०१४ ते ८ आॅगस्ट २०१६ या कालावधीत अकादमीतील अहरण व संवितरण अधिकारी यांच्या खात्याचे चार चेकद्वारे ११ लाख ९० हजार ३६५ रुपयांची रक्कम दुष्यंत पाटील यांच्या खात्यावर बनावट कागदपत्र तयार करून ते बँकेत जमा करून मोबाइल क्रमांकात बदल केला़ यानंतर वेळोवेळी डेबिट कार्डचा वापर करून वेगवेगळ्या तारखेला एटीएममधून रक्कम काढून घेत फसवणूक केली़

Web Title: The police sub-inspector's bank account will have 12 lakh rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.