पोलीस वाहनाची दोन वाहनांना धडक

By Admin | Published: June 23, 2017 04:32 PM2017-06-23T16:32:35+5:302017-06-23T16:32:35+5:30

औरंगाबाद नाक्यावरील घटना : ग्रामीण पोलीस दलाचे वाहन; विद्यार्थिनी जखमी

Police vehicles hit two vehicles | पोलीस वाहनाची दोन वाहनांना धडक

पोलीस वाहनाची दोन वाहनांना धडक

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : नवीन आडगाव नाक्यावरील श्री स्वामी नारायण पोलीस चौकीसमोर नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या भरधाव सुमो कारने दुचाकीसह एका चारचाकी वाहनाला धडक दिल्याची घटना शुक्रवारी (दि़२३) दुपारी पावणे बारा वाजेच्या सुमारास घडली़ या अपघातात महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी झाली आहे.
नाशिक ग्रामीण पोलीस दलातील वाहचालक पोपट पवार हे शुक्र वारी दुपारी सुमो (एमएच १५, अ‍ेअ‍े ५१८३) वाहन घेऊन आडगावकडे जात होते़ स्वामी नारायण पोलीस चौकीसमोरील उड्डाण पुलाखालील पिलर क्रमांक १७ जवळ या सुमोचे ब्रेक अचानक निकामी झाले. चालक पवार यांनी गाडी नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला, परंतु रस्त्याच्या डाव्या बाजूला दहा ते पंधरा प्रवासी उभे असल्याने त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात गाडी उजव्या बाजूला वळविली़ यामुळे सुमोने फिएस्टा कार (एमएच ४१ व्ही ५५०९) व स्कुटीला ( एमएच १६ डीपी ५०७४) धडक दिली़ यामध्ये स्कुटीवरील विद्या मधुकर गवांदे (२२, रा़अमृतधाम) ही अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी जखमी झाली असून, तिच्या डोक्यास मार लागला आहे़ या विद्यार्थिनीस जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़ दरम्यान, या अपघाताबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
 

Web Title: Police vehicles hit two vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.