‘खाकी’ला लक्ष्य करणारा पोलीस अद्याप फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 12:55 AM2019-05-12T00:55:37+5:302019-05-12T00:56:32+5:30

कोम्बिंग आॅपरेशनदरम्यान भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत गस्तीवर असलेल्या गस्तपथकाला मिळालेल्या कॉलनुसार द्वारका येथे सुरू असलेले भांडण मिटविण्यासाठी सीआर मोबाइल वाहनातून पोहोचलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात वाजवून अश्लील शिवीगाळ करणारा पोलीस अधिकारी अद्याप फरार आहे,

Police, who target Khaki, are still absconding | ‘खाकी’ला लक्ष्य करणारा पोलीस अद्याप फरार

‘खाकी’ला लक्ष्य करणारा पोलीस अद्याप फरार

Next

नाशिक : कोम्बिंग आॅपरेशनदरम्यान भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत गस्तीवर असलेल्या गस्तपथकाला मिळालेल्या कॉलनुसार द्वारका येथे सुरू असलेले भांडण मिटविण्यासाठी सीआर मोबाइल वाहनातून पोहोचलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात वाजवून अश्लील शिवीगाळ करणारा पोलीस अधिकारी अद्याप फरार आहे, हे विशेष. पळशीकर यांना निलंबित करण्यात आल्याचे उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले.
भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत मंगळवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास द्वारका येथे सुरू असलेल्या भांडणामुळे जमलेली गर्दी हटवून कायदासुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करणारे पोलीस शिपाई सचिन चौधरी द्वारका येथे दाखल झाले. यावेळी संशयित सहायक उपनिरीक्षक पळशीकर हे एका अस्लम तस्सवूर शेख नावाच्या इसमासोबत वाद घालताना आढळले. चौधरी यांनी दोघांची समजूत काढून वाद मिटवून घरी जाण्यास सांगितले. मात्र याचा राग मनात धरून पळशीकर याने ‘तू आताचा शिपुरडा मला काय शिकवितो, तुला माहीत आहे का मी कोण आहे...’ अशा शब्दांत संवाद साधत त्यांच्या कानशिलात लगावली. दरम्यान, चौधरी यांनी त्वरित वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंह सूर्यवंशी यांना घटनेची माहिती दिली. सूर्यवंशी यांनी गुन्हे शोध पथकाचे वाहन पाठवून तत्काळ मदत दिली. पोलिसांचे वाहन घटनास्थळी आले असता संशयित आरोपीदेखील ‘खाकी’वाला आणि फिर्यादीही पोलीस असल्याचे बघून तेदेखील चक्र ावले. कारवाई करावी तर कोणावर? असा प्रश्न त्यांना पडला. दरम्यान, चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलिसांनी पळशीकरविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
घडलेली घटना निंदनीय असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही मान्य केले असून, या प्रकरणी गंभीर दखल घेत संशयित पळशीकरविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उपआयुक्त पाटील यांनी त्याला अटक करण्याचे आदेशही भद्रकाली पोलिसांना दिल्याचे समजते.

Web Title: Police, who target Khaki, are still absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.