अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हे दाखल करणार - विश्वास नांगरे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 06:46 PM2019-05-03T18:46:39+5:302019-05-03T18:48:00+5:30

नाशिक शहरात मागील वर्षभरात झालेले अपघात व सद्यस्थितीतील  अपघांतांचे प्रमाणे काही प्रमाणात कमी झाले असले तरी यावर्षी जानेवारीपासून एप्रिलपर्यंत ५९ अपघातांमध्ये ६३ नागरिकांचा रस्ते अपघातांमध्ये मृत्यू झाला आहे. यानुसार दिवसाआड एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू होत असून हे प्रमाण चिंताजणक आहे.  त्यामुळे रस्ते वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी शहर पोलिसांकडून काटेकोर उपाययोजना सुरू असून यापुढे वाहतूक नियमांचे उल्लंघन करून अपघातास कारणीभूत ठरणाºया वाहन चालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शुक्रवार (दि.३) पत्रकार परिषदेत दिलीय   

The police will file a criminal complaint against the people responsible for the accident. | अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हे दाखल करणार - विश्वास नांगरे पाटील

अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हे दाखल करणार - विश्वास नांगरे पाटील

Next
ठळक मुद्देवाहतूक नियमांचे उल्लंघन करणारांना इशारा अपघातास कारणीभूत ठराल तर सदोष मुष्यवधाचा गुन्हापोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची माहिती

नाशिक : शहरात मागील वर्षभरात झालेले अपघात व सद्यस्थितीतील  अपघांतांचे प्रमाणे काही प्रमाणात कमी झाले असले तरी यावर्षी जानेवारीपासून एप्रिलपर्यंत ५९ अपघातांमध्ये ६३ नागरिकांचा रस्ते अपघातांमध्ये मृत्यू झाला आहे. यानुसार दिवसाआड एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू होत असून हे प्रमाण चिंताजणक आहे.  त्यामुळे रस्ते वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी शहर पोलिसांकडून काटेकोर उपाययोजना सुरू असून यापुढे वाहतूक नियमांचे उल्लंघन करून अपघातास कारणीभूत ठरणाºया वाहन चालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शुक्रवार (दि.३) पत्रकार परिषदेत दिली.
हेल्मेटशिवाय दुचाकी वाहन चालविणे, सीटबेल्टचा वापर न करणे, वाहतूक नियम तोडणे यामुळे अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढले असून अशाप्रकार वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अपघात झाल्यास  संबंधित चालकावरच सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे विश्वास नांगरे पाटील यांनी पोलीस आयुक्तालयातील पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच, वाहतूक नियमांची जनजागृती व हेल्मेट सक्तीबाबत १३ मे पासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या दहा दिवसांच्या कालावधीत नागरिकांनी हेल्मेट उपलब्ध व इतर नियम अभ्यासून घ्यावेत. यानंतर मात्र थेट कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे. त्यानंतर १३ मे पासून वाहतूक पोलीस विभाग व सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी आणि कर्मचारी संयुक्तपणे एकाच वेळी कारवाई करणार आहेत. विनापरवाना वाहन चालवणे, मद्यप्राशन करून वाहन चालवणे, वन वे तसेचे उलट दिशेने वाहन चालवणे, ट्रिपल शीट, क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी, ओव्हरलोड वाहने यांच्यावर नियमांचे उल्लंघन केल्यास थेट कारवाई होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: The police will file a criminal complaint against the people responsible for the accident.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.