रणगाडा बसविण्याचे काम पोलीस बंदोबस्तात होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 12:09 AM2019-12-19T00:09:03+5:302019-12-19T00:09:19+5:30
येथील प्रभाग क्रमांक २४ मधील सिडकोचे प्रवेशद्वार असलेल्या लेखानगर येथे वाहतूक बेटावर रणगाडा बसविण्याच्या कामास एका नगरसेवकाचा विरोध तर दुसऱ्याचे समर्थन असा प्रकार असल्याने या कामात कोणाचा अडथळा येऊ नये यासाठी महापालिका आयुक्तांनी रणगाड्याचे काम हे पोलीस बंदोबस्तात करण्याचा निर्णय घेतला
सिडको : येथील प्रभाग क्रमांक २४ मधील सिडकोचे प्रवेशद्वार असलेल्या लेखानगर येथे वाहतूक बेटावर रणगाडा बसविण्याच्या कामास एका नगरसेवकाचा विरोध तर दुसऱ्याचे समर्थन असा प्रकार असल्याने या कामात कोणाचा अडथळा येऊ नये यासाठी महापालिका आयुक्तांनी रणगाड्याचे काम हे पोलीस बंदोबस्तात करण्याचा निर्णय घेतला असून, यासंदर्भात पोलीस आयुक्तांना पत्र दिले आहे. यामुळे आता रणगाडा बसविण्यास जागेची अडचण असल्याचे कारण सांगत विरोध करणाºया याच प्रभागाचे माजी नगरसेवक व याचिकाकर्ते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लेखानगर येथे भारत-पाकिस्तान युद्धात वापरण्यात आलेला रणगाडा बसविण्याचा प्रस्ताव नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी मांडला होता. या प्रस्तावास महानगरपालिकेने मंजुरीसुद्धा दिली असून, बांधकाम व्यावसायिकाच्या सीएसआर फंडातून हा रणगाडा उभारण्याचे काम करण्यात येणार होते. मात्र महामार्गालगत असलेल्या समांतर रस्ता आधीच अरुं द असून, या रस्त्याच्या नियोजनात अनेक चुका झाल्या असल्याने यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. महामार्गालगतच्या रस्त्याचे रुंदीकरण झाल्यानंतरच उरलेल्या जागेत रणगाडा बसवण्यात यावा, अशी मागणी याचिकाकर्ते अजिंक्य चुंबळे यांनी केली आहे. मात्र, यासंदर्भात तिदमे यांनी विरोध टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्तात सदरचे काम करावे, ही केलेली मागणी आयुक्त गमे यांनी मान्य केली आहे. यासाठी पोलीस आयुक्तांना लेखी पत्राद्वारे बंदोबस्ताची मागणी केली आहे.
वाहतूक बेटाच्या सुशोभीकरणाचे काम एका बांधकाम व्यावसायिकाच्या सीआरएस फंडातून करण्यात येणार आहे.
लेखानगर येथे रस्ता अरुं द झाल्याने अपघातात वाढ झाली आहे. रणगाडा बसविण्याला विरोध नाही, परंतु चौकातील रस्ता रुं दीकरण झाल्यानंतर जागा उरली तर रणगाडा बसवावा. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गाचे नियोजन करताना केलेल्या चुकीवर पांघरून घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या चुकीमुळे सर्वसामान्यांचे बळी जात असताना त्याचठिकाणी चौक सुशोभीकरणाचा प्रस्ताव देऊन नागरिकांचा जीव अधिक धोक्यात घालण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे.
- अजिंक्य चुंभळे, याचिकाकर्ते
सिडकोतील प्रभाग क्रमांक २४ लेखानगर येथे भारत-पाकिस्तानच्या युद्धात वापरण्यात आलेला रणगाडा बसविण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू होता. हे काम गुरुवार (दि.१९) पासून सुरू होेणार आहे. यामुळे सिडकोच्या सौंदर्यात भर पडणार आहे.
- प्रवीण तिदमे, नगरसेवक