भूमाफियांची दादागिरी पोलीस संपविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:16 AM2021-02-24T04:16:34+5:302021-02-24T04:16:34+5:30
आनंदवलीमध्ये मागील आठवड्यात एका वृद्धाची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या हत्येमागेही भूमाफियांची टोळी असल्याचे तपासात पुढे आले ...
आनंदवलीमध्ये मागील आठवड्यात एका वृद्धाची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या हत्येमागेही भूमाफियांची टोळी असल्याचे तपासात पुढे आले असून, येत्या तीन ते चार दिवसांत या खुनाचा पूर्णपणे उलगडा होण्याची शक्यताही पाण्डेय यांनी वर्तविली आहे. शहरात भूमाफिया मोठ्या प्रमाणात कार्यरत असल्याचेही पाण्डेय यांनी मान्य केले असून, त्यांना वेळीच आळा घालणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. भूमाफियांची दादागिरी संपविण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. भुमाफियांविरुद्ध पोलिसांची वाटचाल येत्या काही दिवसांत नाशिककरांना पहावयास मिळेल, असा विश्वासही पाण्डेय यांनी बोलताना व्यक्त केला.
आनंदवलीत गेल्या बुधवारी (दि.१७) संध्याकाळच्या सुमारास रमेश मंडलिक (७०) या ज्येष्ठ नागरिकाची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या तपासाला पोलिसांनी गती दिली आहे. याप्रकरणी नऊ संशयितांना पोलिसांनी अटक केली असून, खुनाचा म्होरक्याचा पोलीस शोध घेत आहे. भूमाफियांनी शहरात सर्वत्र जाळे विणले आहे. भूमाफियांच्या टोळ्या सक्रिय असून, हे शहराच्या कायदासुव्यवस्थेच्यादृष्टीने घातक ठरणार आहे.
---इन्फो---
दहशत पसरविण्यासाठी मंडलिक यांचा खून
भूमाफियांनी आपली दहशत निर्माण करण्यासाठी मंडलिक यांच्या हत्येचा कट रचल्याचे पोलीस तपासात प्रथमदर्शनी पुढे आले आहे. यामुळे पाण्डेय यांनी वैयक्तिक या गुन्ह्यात लक्ष घातले असून, पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्त व पोलीस निरीक्षकांना गुन्ह्याचा सखोल तपास करत योग्यदिशेने तपास पुढे नेण्याचे स्पष्ट आदेश दिले आहे. पोलीस तपासाकरिता थेट मदत लागल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा, अशी सूचनाही मंगळवारी (दि.२३) गंगापूर पोलीस ठाण्यात सायंकाळी घेतलेल्या बैठकीत त्यांनी दिली.
---इन्फो--
घटनास्थळी केली पाहणी
पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी मंगळवारी मंडलिक यांचा ज्या ठिकाणी खून करण्यात आला त्या घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यावेळी गुन्हे शाखा युनिट-१ तसेच गंगापूर पोलिसांचे तपासी पथक यांना विविध बारकावे सांगत तपासाला दिशा देण्याकरिता सूचना केल्या. यावेळी त्यांनी परिसरातील दुकानदारांशीही संवाद साधला तसेच या भागात संशयास्पदरीत्या फिरणारे लोक आणि वाहने आढळून आल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, माहिती देणाऱ्यांचे नाव पूर्णपणे गोपनीय राहील, असेही आश्वासन पाण्डेय यांनी दिले.
---
फोटो : आर वर २३पोलीस न्यु/ २३पाेलीसन्यु१ नावाने आहे.
घटनास्थळी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी पोलीस अधिकाऱ्यांसमवेत भेट देत आजूबाजूच्या परिसराची अशी पाहणी केली.
--
आनंदवली परिसरातील दुकानदारांशी संवाद साधत माहिती जाणून घेताना दीपक पाण्डेय.
===Photopath===
230221\23nsk_57_23022021_13.jpg~230221\23nsk_58_23022021_13.jpg
===Caption===
घटनास्थळी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी पोलीस अधिकाऱ्यांसमवेत भेट देत आजुबाजुच्या परिसराची अशी पाहणी केली. ~घटनास्थळी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी पोलीस अधिकाऱ्यांसमवेत भेट देत आजुबाजुच्या परिसराची अशी पाहणी केली.