पोलीसही वाचविणार नागरिकांचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:53 AM2018-10-24T00:53:17+5:302018-10-24T00:54:26+5:30
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना ‘वर्ल्ड रिस्टार्ट अ हार्ट डे’ निमित्त दाखविण्यात आलेल्या सीपीआर प्रणालीच्या प्रात्यक्षिकांमुळे रस्त्यावर अचानक एखाद्या व्यक्तीचे हृदय बंद पडल्यास पोलीस हे देवदूताची भूमिका बजावू शकतील, असे प्रतिपादन डॉ़ अनिता नेहेते यांनी केले़ पोलीस आयुक्तालयात झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या़
नाशिक : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना ‘वर्ल्ड रिस्टार्ट अ हार्ट डे’ निमित्त दाखविण्यात आलेल्या सीपीआर प्रणालीच्या प्रात्यक्षिकांमुळे रस्त्यावर अचानक एखाद्या व्यक्तीचे हृदय बंद पडल्यास पोलीस हे देवदूताची भूमिका बजावू शकतील, असे प्रतिपादन डॉ़ अनिता नेहेते यांनी केले़ पोलीस आयुक्तालयात झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या़
अखिल भारतीय भूलतज्ज्ञ संघटनेच्या नाशिक शाखेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ एखाद्या व्यक्तीचे हृदय अचानक बंद पडल्यास त्या व्यक्तीवर जीवन संजीवनी ही प्रकिया केल्यास त्या व्यक्तीचा जीव कशाप्रकारे वाचविता येऊ शकतो याची प्रात्यक्षिके यावेळी संघटनेच्या अध्यक्ष डॉ़ सरला सोहनदानी, डॉ़ राहुल भामरे, डॉ़ अनिता नेहेते, डॉ़ नितीन वाघचौरे, डॉ़ प्रशांत देवरे, डॉ़ अलका कोशिरे, डॉ़ सुनीता संकलेचा, डॉ़ संगीता पवार, डॉ़ पूनम शिवदे, डॉ़ संज्योती सुखात्मे, डॉ़ निकिता पाटील, डॉ़ विवेक खोसे, डॉ़ दिनेश पाटील, डॉ़ निनाद चोपडे यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना दाखविली़ या कार्यक्रमात पोलीस आयुक्त डॉ़ सिंगल, उपायुक्त विजयकुमार मगर, लक्ष्मीकांत पाटील, श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे आदींसह सुमारे २०० ते २५० पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी सीपीआर प्रणालीबाबत माहिती करून घेत प्रात्यक्षिक केले़