पोलीसदादा, स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:14 AM2021-04-25T04:14:28+5:302021-04-25T04:14:28+5:30
नाशिक : कोरोनाचा शहरासह जिल्ह्यात वेगाने फैलाव होत आहे. कोरोनाच्या कचाट्यातून ‘ऑन रोड’ असणारे फ्रन्टलाईन पोलीस दलदेखील सुटलेले नाही. ...
नाशिक : कोरोनाचा शहरासह जिल्ह्यात वेगाने फैलाव होत आहे. कोरोनाच्या कचाट्यातून ‘ऑन रोड’ असणारे फ्रन्टलाईन पोलीस दलदेखील सुटलेले नाही. एकीकडे पोलिसांना कोरोनाची बाधा होत असली, तरी दुसरीकडे कडक निर्बंधांची चोख अंमलबजावणी करण्याचा अतिरिक्त ताण मात्र प्रचंड वाढला आहे. या दुहेरी लढाईत पोलिसदादाला स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्यावी लागणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर व ग्रामीण पोलिसांचे लसीकरण वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून केला जात आहे. शहर पोलीस आयुक्तालयात एकूण ३ हजार ८८ पोलीस आहेत. त्यांच्यापैकी ८५ टक्के पोलिसांचे कोरोना प्रतिबंधक लसीच्या पहिल्या डोसचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. तसेच ५० टक्के पोलिसांचे दुसऱ्या डोसचे लसीकरण पूर्ण झाले आहे. आतापर्यंत २१५ पोलीस कोरोनाबाधित आढळले होते. त्यापैकी ५७ कर्मचारी ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या १५८ शहर पोलिसांवर उपचार सुरु आहेत. दुर्दैवाने चार कोरोना योद्धा पोलिसांचा मृत्यू झाला आहे.
ग्रामीण पोलीस दलात एकूण ३ हजार १३३ पोलीस आहेत. त्यापैकी ३,०७४ पोलिसांनी कोरोनाची लस घेतली आहे तसेच ७४ टक्के पोलिसांनी दुसरा डोस घेतला आहे. ग्रामीण पोलीस दलात आतापर्यंत ५५ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी ४२ पोलिसांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोसही पूर्ण केला आहे. सध्या ४९ कर्मचारी उपचारार्थ दाखल आहेत.
दिवस-रात्र कर्तव्यावर असताना साहजिकच स्वत:च्या आरोग्याकडे पोलिसांकडून दुर्लक्ष होते; मात्र पोलिसांना कोरोनाच्या या संकटकाळात स्वत:च्या आरोग्याबाबत अधिक सतर्क राहावे लागणार आहे. तरच त्यांना आपल्या कुटुंबियांसह समाजाचेही आरोग्य टिकविण्यात यश येईल.
----पॉइंटर्स---
लसीकरण (पहिला डोस)
जिल्ह्यातील एकूण पोलीस अधिकारी - १९१
जिल्ह्यातील एकूण पोलीस कर्मचारी - २,४२९
दुसरा डोस---
अधिकारी - ९४
कर्मचारी - १,४२५
--आलेख- ---
२६५ पोलीस पॉझिटिव्ह (आलेख)
एकूण कोरोनाबाधित पोलीस - २७०
सध्या उपचार सुरु असलेले पोलीस - २६३
एकूण कोरोनाबाधित अधिकारी - २९
एकूण कोरानाबाधित कर्मचारी - २५५
एकुण मृत्यू - ०४
----
बाबा, आम्ही घरी वाट पाहतोय
माझी आई काही दिवसांपूर्वीच कोरोनाबाधित झाली. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काका गावाकडे पॉझिटिव्ह आल्याने आजी गावाला गेली आहे. मोठा दादा, मी आणि बाबा आम्ही तिघे घरी आहोत. बाबा पोलीस आहेत, त्यांची ड्युटी कडक असते. त्यामुळे बाबा रात्री उशिरा घरी येतात अन् सकाळी लवकर जातात. आम्हाला बाबांची खूप काळजी वाटते. लोकांनी खबरदारी घेत नियम पाळले तर पोलिसांवरील वाढलेला ताण कमी होईल. - यशराज मोहिते, पोलीस पाल्य.
---
माझे पप्पा पोलीस उपायुक्त तर मम्मी मनपा उपायुक्त आहे. कोरोनामुळे आई व बाबा शहराची कायदा, सुव्यवस्था व आरोग्य व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी झटत आहेत. मोठा दादा आणि मी घरीच असतो. अनेकदा बाबांना नाईट ड्युटी असते, त्यामुळे बाबांशी भेट होत नाही, त्याचे वाईट वाटते, त्यांची आठवण येते. बाबा अधुनमधून वेळ काढत माझ्यासोबत व्हिडीओ कॉलवर बोलतात.
- वरदवर्धन तांबे, पोलीस पाल्य
----
आमचे बाबा उपजिल्हाधिकारी तर मम्मा पोलीस उपायुक्त आहे. कोरोना वाढल्यापासून त्यांना खूप सारे काम असते. शुक्रवारी बाबांचा वाढदिवस होता, मात्र बाबा मध्यरात्री आले. आम्ही त्यांची वाट बघत केक तसाच ठेवला होता. रात्री बारा वाजता बाबांना ऑडियो सेंड केला आणि म्हणालो, ‘तुम्ही या ना लवकर माझ्याकडे, पण बाबांना खूपच उशीर झाला. नंतर आम्ही दोघेही झोपलो. मम्माला पण नाईट ड्युटी असते, त्यामुळे कधी-कधी तिचीही भेट होत नाही.
- आर्यवीर, मौर्य श्रींगी - पोलीस पाल्य
---------
फोटो आर वर २४ कोविड व २४ सिरिंज नावाने सेव्ह आहे. डमी फॉरमेट २४ व्हॅक्सिनेशन ऑफ पोलीस नावाने सेव्ह आहे.