गणेशोत्सवासाठी पोलिसांचे मॉकड्रील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 02:22 PM2018-09-08T14:22:16+5:302018-09-08T14:22:30+5:30

घोटी : गणेशोत्सवासाठी इगतपुरी तालुक्यातील पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. गणेशोत्सव काळामध्ये नागरिकांसाठी निर्धोक व सुखकर गणेशोत्सव व्हावा यासाठी गुप्त माहिती, तपासणी, आपत्कालीन परिस्थितीसाठी रु ग्णवाहिका, मोठी यंत्रणा कार्यरत राहणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल झेंडे यांनी सांगितले.

 Police's Mockadrial for Ganeshotsav | गणेशोत्सवासाठी पोलिसांचे मॉकड्रील

गणेशोत्सवासाठी पोलिसांचे मॉकड्रील

Next

घोटी : गणेशोत्सवासाठी इगतपुरी तालुक्यातील पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. गणेशोत्सव काळामध्ये नागरिकांसाठी निर्धोक व सुखकर गणेशोत्सव व्हावा यासाठी गुप्त माहिती, तपासणी, आपत्कालीन परिस्थितीसाठी रु ग्णवाहिका, मोठी यंत्रणा कार्यरत राहणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल झेंडे यांनी सांगितले. वाडीव-हे पोलीस ठाण्यात तालुक्यातील तीन पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचार्यांचे मॉकड्रील घेण्यात आले. सर्वांगीण प्रकारे पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करून सतर्क करण्यात आले. उपाययोजनांची जय्यत तयारी प्रशासन स्तरावरून करण्यात आली असल्याचे झेंडे यांनी यावेळी सांगितले. यावेळी पोलीस निरीक्षक सुहास देशमुख आदींसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
वाडीºहे येथे शांतता समितीची बैठक झाली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल झेंडे, पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांनी सांगितले की वाडीवºहे, घोटी, इगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडणार्या प्रत्येक घटनेवर २४ तास पोलीस पथकाचे सुक्ष्म लक्ष राहणार आहे. तालुक्यात गणेशोत्सव काळामध्ये कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांची कुमक तैनात ठेवली जाणार आहे. यावेळी गेल्या वर्षी सर्वोत्कृष्ट कार्य केलेल्या गणेश मंडळांना बक्षीस वितरण करण्यात आले. बैठकीप्रसंगी विविध गावातील गणेश मंडळ पदाधिकारी, पोलीस पाटील, पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title:  Police's Mockadrial for Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक