पोलिसांची कामगिरी : मद्यधुंद मामाने सोडले होते रेल्वेस्थानकावर एकटे चिमुकलीला केले आईच्या स्वाधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 01:31 AM2018-05-27T01:31:23+5:302018-05-27T01:31:23+5:30

नाशिकरोड : दारूच्या नशेत धुंद असलेल्या मामाने पाच वर्षांच्या भाचीला नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या आवारात एकटीला बसवून कुठेतरी निघून गेल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पोलिसांनी त्या मुलीला तिच्या आईच्या ताब्यात सुखरूप दिले.

Police's performance: The drunkard was left out of the railway station | पोलिसांची कामगिरी : मद्यधुंद मामाने सोडले होते रेल्वेस्थानकावर एकटे चिमुकलीला केले आईच्या स्वाधीन

पोलिसांची कामगिरी : मद्यधुंद मामाने सोडले होते रेल्वेस्थानकावर एकटे चिमुकलीला केले आईच्या स्वाधीन

Next
ठळक मुद्देदेवदर्शन व गंगेवर आंघोळीसाठी आलेगौतम सोनवणे यांनी तनुश्रीला त्यांच्या ताब्यात दिले

नाशिकरोड : दारूच्या नशेत धुंद असलेल्या मामाने पाच वर्षांच्या भाचीला नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या आवारात एकटीला बसवून कुठेतरी निघून गेल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पोलिसांनी त्या मुलीला तिच्या आईच्या ताब्यात सुखरूप दिले.
नांदेड येथील पाच वर्षांची तनुश्री अशोक दीक्षित ही आपला मामा सतीश शर्मा व आजोबा राधेश्याम शर्मा यांच्यासोबत नाशिकला देवदर्शन व गंगेवर आंघोळीसाठी आले होते. शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास पुन्हा नांदेडला जाण्यासाठी नाशिकरोड रेल्वेस्थानक प्रवेश मार्गाच्या रस्त्याच्या कडेला तनुश्री हिला सामानासह एकटे बसवून कुठेतरी निघून गेला.
तीन-चार तासापासून मुलगी एकटी बसल्याचे सामाजिक कार्यकर्ते गौतम सोनवणे, रिक्षाचालक संतोष शिंदे, शिवा साळवे यांच्या लक्षात येताच त्यांनी तिला सोबत घेऊन बस स्थानकावरील पोलीस चौकीत हवालदार ए. के. गायकवाड, पी. एस. माळोदे यांच्याकडे आणले. पोलीस व सोनवणे यांनी तनुश्रीला खाण्यापिण्यास दिल्यानंतर तिची विचारपूस केली असता ती नांदेड येथून मामा व आजोबांसोबत आल्याचे सांगितले. तनुश्रीचा घरचा मोबाइल क्रमांक घेऊन पोलिसांनी चौकशी केली असता तनुश्रीची आई चंदा दीक्षित यांनी मुलगी मामा व आजोबांसोबत नाशिकला आल्याचे सांगितले. यावेळी पोलिसांनी तनुश्रीचा मामा सतीश दारूच्या नशेत धुंद असल्याने त्याच्याकडे मुलीला देणार नाही, तुम्ही घ्यायला या असे सांगुन मुलीला सायंकाळपर्यंत पोलीस चौकीत ठेवुन रात्री गौतम सोनवणे तनुश्रीला आपल्या घरी घेऊन गेले होते.
शनिवारी दुपारी तनुश्रीची आई चंदा अशोक दीक्षित व चुलत आजोबा पुरुषोत्तम शर्मा हे बसस्थानक पोलीस चौकीवर आले असता त्यांच्या ताब्यात पोलीस गायकवाड, माळोदे व सामाजिक कार्यकर्ते गौतम सोनवणे यांनी तनुश्रीला त्यांच्या ताब्यात दिले.

Web Title: Police's performance: The drunkard was left out of the railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.