दर्जेदार रस्त्यांसाठी धोरण बदलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:35 AM2018-10-15T00:35:30+5:302018-10-15T00:36:00+5:30
रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी वारंवार होणारा खर्च टाळून दर्जेदार रस्ते व्हावे यासाठी शासनाने रस्ते विकासाचे धोरण बदलत दीर्घकाल रस्ते चांगले राहावे यासाठी धोरण आखले आहे. ठेकेदारांवर दहा वर्षे रस्त्याची देखभाल दुाुस्तीची जबाबदारी राहणार असल्याने जनतेची खड्ड्यांतून कायमस्वरूपी मुक्तता होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
दिंडोरी : रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी वारंवार होणारा खर्च टाळून दर्जेदार रस्ते व्हावे यासाठी शासनाने रस्ते विकासाचे धोरण बदलत दीर्घकाल रस्ते चांगले राहावे यासाठी धोरण आखले आहे. ठेकेदारांवर दहा वर्षे रस्त्याची देखभाल दुाुस्तीची जबाबदारी राहणार असल्याने जनतेची खड्ड्यांतून कायमस्वरूपी मुक्तता होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
नाशिक-वणी-कळवण-नामपूर या रस्त्याचे काम हायब्रीड अन्युईटी कार्यक्रमांतर्गत होणार
असून, सदर कामाचे भूमिपूजन व अवनखेड येथे विविध विकासकामांचे उद्घाटन बांधकाममंत्री पाटील
यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गिरीश महाजन होते.
पुढे बोलताना बांधकाम मंत्री पाटील यांनी, केंद्र सरकारने राज्यातील विविध महामार्गांना मोठ्या प्रमाणात निधी दिला, तर राज्य सरकारनेही राज्यातील विविध रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी दिला आहे, असे सांगत अवनखेड येथील विकासकामांबद्दल त्यांनी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, सरपंच नरेंद्र जाधव यांच्या कामाचे कौतुक करत शाबासकीची थाप दिली. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचेही भाषण झाले. सरपंच नरेंद्र जाधव यांनी स्वागत केले.
बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत पगारे यांनी प्रास्ताविक केले. भाजयुमोतर्फेतालुकाध्यक्ष योगेश बर्डे यांनी स्वागत केले.
यावेळी आमदार नरहरी झिरवाळ, आमदार जे.पी.गावित, भाजपाचे लक्ष्मण सावजी, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, तालुकाध्यक्ष संजय कावळे, ज्येष्ठ नेते चंद्रकांत राजे, महिला जिल्हाध्यक्ष मंदा पारख, उपसरपंच विजय पिंगळ, रणजित देशमुख, दिंडोरीचे माजी नगराध्यक्ष प्रमोद देशमुख, नगरसेवक तुषार वाघमारे, भास्कर कराटे, दत्तात्रय जाधव, काका देशमुख, विलास देशमुख, प्रांताधिकारी उदय किसवे, तहसीलदार बाबासाहेब गाढवे, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता रणजित हांडे, मुख्य अभियंता हेमंत पगारे, उपविभागीय अभियंता यशवंत पाटील, कार्यकारी अभियंता सूर्यकांत अहिरे, शिवाजी पिंगळ, संपत पिंगळ, तुषार घोरपडे, फारु ख बाबा, सचिन बर्डे, साजन पगारे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बापू पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
कमी निधीत होणार जास्त कामे
पूर्वीच्या सरकारच्या काळात रस्ते झाले की वर्षात त्यावर खड्डे पडायचे व पुन्हा रस्त्याचे कामे व्हायचे; पण आताच्या सरकारने त्यात बदल केला आहे. चाळीस टक्के खर्च सरकार करणार असून, उर्वरित खर्च ठेकेदाराला करावा लागणार आहे. त्यामुळे कमी निधीत जास्त कामे होणार आहेत. भूसंपादनाचे जे काही प्रश्न असतील ते मार्गी लावले जातील, असे सांगत राज्यात दुष्काळी परिस्थिती असून टंचाईग्रस्त तालुके जाहीर करण्यात आले आहे. पुन्हा आढावा घेऊन जे गावे टंचाईग्रस्त आहे त्यांना टंचाईग्रस्त म्हणून घोषित करत उपाययोजना केल्या जातील असे पाटील यांनी म्हणाले.