दीड लाख बालकांना पोलिओ डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 01:34 AM2019-03-11T01:34:14+5:302019-03-11T01:35:02+5:30
राष्टÑीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत महापालिका क्षेत्रात रविवारी (दि. १०) राबविण्यात आलेल्या मोहिमेत महापालिका क्षेत्रातील शून्य ते पाच वर्ष वयोगटातील सुमारे दीड लाख बालकांना पोलिओचा डोस पाजण्यात आला.
नाशिक : राष्टÑीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत महापालिका क्षेत्रात रविवारी (दि. १०) राबविण्यात आलेल्या मोहिमेत महापालिका क्षेत्रातील शून्य ते पाच वर्ष वयोगटातील सुमारे दीड लाख बालकांना पोलिओचा डोस पाजण्यात आला. शहरात ६९४ बूथ व ९० ट्रॅन्झिस्ट टीमकडून २२४६ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून बालकांचे लसीकरण करण्यात आले. महापौर रंजना भानसी यांनीही बालकास डोस पाजला.
गेल्या दोन दिवसांपासून शहर परिसरात ध्वनिक्षेपकावरून पल्स पोलिओ मोहिमेची माहिती नागरिकांना देण्यात आल्याने त्याचा उत्तम प्रतिसाद लाभला. ज्या ठिकाणी महापालिकेने पोलिओ लसीकरणाचे बूथ लावले होते तेथे सकाळपासून पालक आपल्या बालकांना घेऊन आले होते. दुपारी २ वाजेपर्यंत बहुसंख्य बूथवर पालकांची चांगली गर्दी दिसून आली.