नाशिक शहरात ८० टक्के बालकांना पोलिओ डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2022 01:30 AM2022-02-28T01:30:16+5:302022-02-28T01:30:44+5:30
शहरातील रविवारी (दि.२७) राबविण्यात आलेल्या पल्स पोलिओ मोहिमेत एकाच दिवसात उद्दिष्टापैकी एकूण ८०.२४ टक्के बालकांना लसीकरण करण्यात आले आहे.
नाशिक : शहरातील रविवारी (दि.२७) राबविण्यात आलेल्या पल्स पोलिओ मोहिमेत एकाच दिवसात उद्दिष्टापैकी एकूण ८०.२४ टक्के बालकांना लसीकरण करण्यात आले आहे. रविवारी (दि.२७) पल्स पोलीओ माेहीम संपूर्ण शहरात राबवण्यात आली. नाशिकरोड येथे बिटको रुग्णालयात या मोहिमेचा शुभारंभ आयुक्त कैलास जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे उपस्थित होते. महापालिकेने या मोहिमेसाठी एकूण ३० बुथ उभारले होते आणि १ लाख ९४ हजार ७२४ बालकांना उद्दिष्ट होते. त्यातील १ लाख ५६ हजार २५४ मुलांना डोस देण्यात आले आहेत.
--