पाच लाख बालकांना पोलिओचे डोस

By admin | Published: January 18, 2015 11:57 PM2015-01-18T23:57:03+5:302015-01-19T00:25:18+5:30

शहरात महापौर मुर्तडक यांच्या हस्ते शुभारंभ; आणखी तीन दिवस सुरु राहणार मोहीम

Polio doses of five lakh children | पाच लाख बालकांना पोलिओचे डोस

पाच लाख बालकांना पोलिओचे डोस

Next

नाशिक : राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत रविवारी शहरासह संपूर्ण जिल्हाभरात पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली़ या मोहिमेद्वारे शहरात १ लाख २७ हजार ४५० बालकांना, तर जिल्ह्यातील विविध तालुक्यांत ३ लाख ७३ हजार ४६५ असे एकूण ५ लाख ९१५ बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले़ पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला, तर शिंदे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांच्या हस्ते लहान बालकाला पोलिओ डोस पाजून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला़
शहरात राबविण्यात आलेल्या या मोहिमेसाठी मनपा आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका क्षेत्रात ५५१ बुथ उभारण्यात आले होते़ यासाठी १६३३ कर्मचारी व ११५ पर्यवेक्षक, तर प्रभाग अधिकारी म्हणून मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती़ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ सुशील वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हाभरात राबविण्यात आलेल्या मोहिमेसाठी ३०९५ बुथ लावण्यात आले होते़ यासाठी ७९१८ कर्मचारी व ६२७ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती़
ग्रामीण भागात पल्स पोलिओ मोहीम आणखीन तीन दिवस ही मोहीम राबविली जाणार असून, उर्वरित बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात येणार आहे़
मंगळवार, बुधवार व गुरुवारी राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेसाठी २४१० टीम, रेल्वे स्टेशन व बसस्थानकावर ३०६ बुथ तसेच १३८ मोबाइल टीम कार्यरत असणार आहेत़ या मोहिमेसाठी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कर्मचारी, विभागीय अधिकारी, खासगी सहा़ परिचारिका, खासगी वैद्यकीय व्यावसायिक, अंगणवाडीसेविका यांनी विशेष परिश्रम घेतले़ (प्रतिनिधी)

Web Title: Polio doses of five lakh children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.