सिन्नरच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात पोलिओ लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:49 AM2021-02-05T05:49:26+5:302021-02-05T05:49:26+5:30
ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली एका बालकाला पोलिओचे थेंब पाजून लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. ...
ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली एका बालकाला पोलिओचे थेंब पाजून लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. डॉ. लहाटे यांनी पोलिओ निर्मूलन मोहिमेचा १९९५ पासूनचा इतिहास उलगडला व मार्गदर्शन केले. नगरसेवक गोविंद लोखंडे यांनी मनोगत व्यक्त केेले. डॉ. प्रशांत खैरनार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. पवार यांनी आभार मानले. यावेळी उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले, नगरसेवक विजय जाधव, सोमनाथ पावसे, नरगसेविका सुजाता तेलंग, वैद्यकीय अधिकारी डॉ. निर्मला पवार आदी उपस्थित होते.
इन्फो...
नेहरवाडी येथे पोलिओ लसीकरण उत्साहात
नेहरवाडी दापूर अंगणवाडी येथे (केंद्र क्र. २८) पोलिओ लसीकरण उत्साहात पार पडले. घरातील पाच वर्षाच्या आतील बालकांना पोलिओ डोस पाजून घ्या, असे आवाहन अंगणवाडी कार्यकर्ती राधा दळवी यांनी केले होते. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास आव्हाड, मदतनीस झुंबरबाई आव्हाड, मोहन आव्हाड, सोमनाथ भगत, संदीप आव्हाड, देविदास आव्हाड, शंकर निरभवणे आदींसह बालक, माता उपस्थित होते.
===Photopath===
010221\01nsk_6_01022021_13.jpg
===Caption===
सिन्नर येथे बालकाला पल्स पोलिओ थेंब पाजून मोहिमेचा शुभारंभ करताना उपजिल्हा रुग्णालाच्या अधिक्षीका डॉ. वर्षा लहाटे. समवेत उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले, नगरसेवक गोविंद लोखंडे, विजय जाधव, डॉ. प्रशांत खैरनार, सोमनाथ पावसे, नगरसेविका सुजाता तेलंग, वैद्यकीय अधिकारी डॉ. निर्मला पवार.