घोटी पोलीस ठाण्यातर्फे पोलीसमित्रांची रॅली

By admin | Published: November 22, 2015 11:29 PM2015-11-22T23:29:37+5:302015-11-22T23:30:28+5:30

घोटी पोलीस ठाण्यातर्फे पोलीसमित्रांची रॅली

Polisititra rally by Ghoti police station | घोटी पोलीस ठाण्यातर्फे पोलीसमित्रांची रॅली

घोटी पोलीस ठाण्यातर्फे पोलीसमित्रांची रॅली

Next

घोटी : घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा आण िसुव्यवस्था अबाधित राहावी,गुन्हेगारी घरफोडी भुरट्या चोर्या आदींना आळा बसावा यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने स्थानिक युवकाचे सहकार्य लाभावे यासाठी पोलीस मित्र निवडले असून या
पोलीस मित्रानी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन
घोटी पोलीस ठाण्याचे सहायय्क पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांनी केले.
घोटी पोलीस स्टेशनची भौगोलिक रचना मोठी असल्याने तसेच या पोलीस ठाण्यावर लोहमार्ग,महामार्ग यांच्या सुरिक्षततेची जबाबदारी असल्याने अपुर्या मनुष्यबळाअभावी सर्वच ठिकाणी पोलिसांना पोहचणे शक्य होत नसते याउलट सर्वसामान्य जनतेच्या पोलिसांकडून अपेक्षा वाढल्या असल्याने अनेक ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने पोलीस मित्राची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत.
यानुसार घोटी पोलीस स्टेशन ने साडेतीनशे पोलीस मित्रांची नेमणूक केली.
आज या पोलीस मित्रांची सर्वसामान्य जनतेला ओळख व्हावी या उद्देशाने घोटी शहरातून रॅली काढण्यात आली.या रॅलीत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे उपनिरीक्षक गणेश शेळके,कमलेश बच्छाव,सतीश पवार आदींनी पोलीस मित्राना मार्गदर्शन केले.(वार्ताहर)

Web Title: Polisititra rally by Ghoti police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.