पाथरेत राजकीय वातावरण तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 08:56 PM2020-12-17T20:56:56+5:302020-12-18T00:26:18+5:30

पाथरे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आलेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. जेव्हापासून ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे, तेव्हापासून पाथरेत आपापल्या वार्डात हालचाली सुरू झाल्या आहेत.

The political atmosphere in Pathare heated up | पाथरेत राजकीय वातावरण तापले

पाथरेत राजकीय वातावरण तापले

Next
ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजताच बैठकांना जोर

कोरोनामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्यात आले होते. तेव्हापासून ग्रामपंचायच्या निवडणुका केव्हा जाहीर होतात, याकडे पाथरे भागातील नागरिकांचे लक्ष लागले होते. स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने व गावपातळीवर पकड मजबूत करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीकडे गांभीर्याने पाहतात. पाथरे बुद्रुक, खुर्द, वारेगावात राजकीय चर्चा सुरू होऊन कट्ट्यावर बैठका घेतल्या जात आहेत. यातून आता उमेदवार शोधले जात असून, तशी चाचपणी चालू झाली आहे. पाथरे गावात तीन ग्रामपंचायत असल्याने इथे तिन्ही गावच्या चर्चा आणि विषय चघळले जात आहेत. पाथरे बुद्रुक, पाथरे खुर्द, वारेगाव या गावात आता संभाव्य उमेदवार आपण किती योग्य आहोत, याची मतदारांना ग्वाही देत आहेत. यावेळी सामाजिक बांधीलकी असणारा, हुशार उमेदवार निवडणूक द्यायचा असा सूर मतदाराकडून येत आहे.
ग्रामपंचायत निवडणूक म्हटली की, स्थानिक पातळीवर मोर्चेबांधणी महत्त्वाची ठरते. स्थानिक पातळीवर ही निवडणूक प्रतिष्ठेची होत असते. आता पाथरे परिसरात तिन्ही ग्रामपंचायत क्षेत्रात राजकीय रंग वाढला आहे. तालुक्यातील राजकारणात पाथरे गावची मोलाची भूमिका असते. त्यामुळे या वेळच्या ग्रामपंचायत निवडणुकीत आपला संपूर्ण पॅनल निवडून आला पाहिजे, यासाठी आजी-आजी लोकप्रतिनिधींमार्फत प्रयत्न केले जातील, तसे स्थानिक पातळीवरील नेते, कार्यकर्ते गांभीर्याने विचार करीत आहेत.

Web Title: The political atmosphere in Pathare heated up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.