मालेगावी बोलू लागली राजकीय बॅनरबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2022 10:14 PM2022-01-25T22:14:14+5:302022-01-25T22:14:14+5:30

सोयगाव : राजकीय कार्यक्रम, विकासकामांचं उद्घाटन, नेत्यांचे वाढदिवस, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तसेच धार्मिक सणानिमित्त चौक, रस्ता, नाक्यांवर होणाऱ्या बॅनरबाजीमुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत.

Political banner-waving started speaking in Malegaon | मालेगावी बोलू लागली राजकीय बॅनरबाजी

मालेगावी बोलू लागली राजकीय बॅनरबाजी

Next
ठळक मुद्देआगामी महानगरपालिका निवडणुकीचे वाजू लागले पडघम

सोयगाव : राजकीय कार्यक्रम, विकासकामांचं उद्घाटन, नेत्यांचे वाढदिवस, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तसेच धार्मिक सणानिमित्त चौक, रस्ता, नाक्यांवर होणाऱ्या बॅनरबाजीमुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत.

उघड उघड जरी राजकीय सभांतून अथवा प्रसारमाध्यमातून बाजू मांडली जास्त नसली तरी बॅनरबाजीच्या माध्यमातून कोण कोणाबरोबर व कोणाच्या विरोधात सरळ सरळ राजकीय समीकरणे ही बॅनरबाजी सांगू लागलीय. कधी काळी ह्यह्यहम साथ साथ हैह्णह्ण सांगणारे हे बॅनर आज ह्यह्यहम आपके है कोन?ह्णह्ण असा मूक प्रश्न विचारताना दिसतात. विशेष म्हणजे ही बॅनरबाजी बघून सर्वसामान्यांमध्ये खुमासदार चर्चा ऐकू येतेय, सामान्य लोक त्यांच्या पद्धतीने दोस्ती-दुश्मनीची कारणे देऊ लागलेत.

तर्क लावणाऱ्यात ही विविधता असून आर्थिक, राजकीय, आपसी मनमुटाव अशी अनेक कारणे सध्या सामन्यांमध्ये चर्चिली जात आहेत. चौकाचौकात याच मुद्द्यांवर तासन्तास चर्चा असून पान स्टॉल, हॉटेल येथे तर आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवार कोण असतील, याची चाचपणी झाली असून विजयी उमेदवार घोषित करण्याचेच राहिले आहे.

आगामी महानगरपालिका निवडणुकीचे वारे सुप्त स्वरूपात का असेना पण वाहू लागलेत. निवडणूक अवघ्या चार-पाच महिन्यात होऊ घातल्यात. त्यात विशेष करून मालेगावातील प्रभाग ९ व १० ला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दोन्ही प्रभाग सेना व भाजपचे बालेकिल्ले असून या भागात लागणारे बॅनर, फ्लेक्स मोठे आकर्षणाचे व चर्चेचे केंद्रबिंदू ठरत आहेत. आपसी राजकीय बलाची चाचपणी होताना जनता अनुभवत आहे.
प्रभाग नऊ व दहामधील ह्यह्यसटाणा नाका, ॲरोमा स्टॉप, टेहेरे चौफुली, सोयगाव, माऊली चौक, डी. के. स्टॉप, जिजामाता उद्यान चौकह्णह्ण या चौकात होत असलेली राजकीय बॅनरबाजी न बोलताही बरेच काही सांगून जात असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. कोण कोणाच्या बॅनरवर दिसत नाही, तर कोणाच्या बॅनरवर कोण प्रकट होत आहे, यावरून राजकीय दोस्ती-दुश्मनी, समर्थक- विरोधक सामान्य जनतेला समजू लागलेत.
 

Web Title: Political banner-waving started speaking in Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.