भंगार बाजाराला राजकारण कलाटणीचा डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 11:48 PM2017-10-25T23:48:00+5:302017-10-26T00:28:26+5:30
दीपावली सणापूर्वीच महापालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये पोलीस बंदोस्तात बहुचर्चित सातपूर-अंबड लिंक रोड भागात पुन्हा अतिक्रमणविरोधी मोहीम राबवित भंगार बाजार पूर्ण मोकळा केला. परंतु यानंतर या मुद्द्यावर राजकारण आणत खोडा घालण्याचे काम सुरू करून आंदोलने केली जात असल्याचा आरोप याचिकाकर्ते व नगरेसवक दिलीप दातीर यांनी पत्रकार परिषदेत केला.
सिडको : दीपावली सणापूर्वीच महापालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये पोलीस बंदोस्तात बहुचर्चित सातपूर-अंबड लिंक रोड भागात पुन्हा अतिक्रमणविरोधी मोहीम राबवित भंगार बाजार पूर्ण मोकळा केला. परंतु यानंतर या मुद्द्यावर राजकारण आणत खोडा घालण्याचे काम सुरू करून आंदोलने केली जात असल्याचा आरोप याचिकाकर्ते व नगरेसवक दिलीप दातीर यांनी पत्रकार परिषदेत केला. न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने पोलीस बंदोबस्तात राबविलेल्या मोहिमेत कारवाई करण्यात आलेल्या विक्रेत्यांच्या एकगठ्ठा मतांवर डोळा ठेवून यात राजकारण आणले जात आहे. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार महापालिकेने ही कारवाई केली असून, या कारवाईत व्यावसायिकांचा जप्त करण्यात आलेला कच्चा माल परत द्यावा यासाठी काही राजकीय पक्षाकडून मनपाकडे आंदोलन केली जात असल्याने हा न्यायालयाचा अवमान असल्याचेही दातीर यांनी सांगितले. मुळात अंबड व सातपूर वसाहतीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या व मनपा हद्दीत येत असलेल्या अनधिकृत भंगार विक्रेत्यांकडून आरोग्यास हानिकारक व अपायकारक व्यवसाय करण्यात येत होते. परप्रांतीय भंगार विक्रेत्यांंबरोबर काही गुन्हेगार प्रवत्तींनी येथे ठाण मांडलयाने याठिकाणी अवैध शस्त्रास्त्रे, हाणामाºया, खंडणी यासारख्या प्रकारांमुळे भंगार बाजार व परिसर संवेदनशील विभाग बनल्याने पोलीस यंत्रणेचीसुद्धा डोकेदुखी वाढली होती. परंतु मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण व पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी भूमिका घेतली. काही दिवसांपासून राजकारण आणले जात असल्याचा आरोपही दिलीप दातीर यांनी केला आहे. या पत्रकार परिषदेप्रसंगी नगरसेवक भागवत आरोटे, पंकज दातीर, गिरीश बंदावणे आदी उपस्थित होते.
भंगार बाजारात घातक प्लॅस्टिक तसेच मोठ्या प्रमाणावरील भंगाराचे साठे रहिवासी विभागात बेकायदेशीरपणे ठेवण्यात येत होते. याठिकाणी रसायनाचे मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक डबे, भंगार मालाचे साठे ठेवण्यात येत असल्याने विविध साथीचे आजार पसरत होते तसेच भंगार बाजारामुळे शहराच्या सौंदयालाही बाधा होत असल्याचे दातीर यांनी यावेळी सांगितले.