मतदार चिठ्ठ्यांवर राजकीय चिन्हाचा प्रसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 01:56 AM2019-04-30T01:56:24+5:302019-04-30T01:56:44+5:30

लोकसभा निवडणुकीची मतदानप्रक्रिया शहरात शांततेत पार पडली. किरकोळ स्वरूपाच्या वादविवादाच्या तक्रारींचा अपवाद वगळात मतदान सुरळीत पार पडले. मुंबईनाका, म्हसरूळ, देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत चिठ्ठ्यांवर राजकीय चिन्हांचा कार्यकर्त्यांकडून होणारा वापर थांबविला तसेच मोटारीतून रोकड पोलिसांनी देवळालीत जप्त करून संबंधितांवर कारवाई केली.

 Political icons spread on voter papers | मतदार चिठ्ठ्यांवर राजकीय चिन्हाचा प्रसार

मतदार चिठ्ठ्यांवर राजकीय चिन्हाचा प्रसार

Next

नाशिक : लोकसभा निवडणुकीची मतदानप्रक्रिया शहरात शांततेत पार पडली. किरकोळ स्वरूपाच्या वादविवादाच्या तक्रारींचा अपवाद वगळात मतदान सुरळीत पार पडले. मुंबईनाका, म्हसरूळ, देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत चिठ्ठ्यांवर राजकीय चिन्हांचा कार्यकर्त्यांकडून होणारा वापर थांबविला तसेच मोटारीतून रोकड पोलिसांनी देवळालीत जप्त करून संबंधितांवर कारवाई केली.
सोमवारी (दि.२९) सकाळी ७ वाजता शहर व परिसरातील विविध मतदान कें द्रांवर मतदानप्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. दरम्यान, सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास नाशिक मध्य मतदारसंघातील पखालरोडवरील सावित्रीबाई फुले शाळा या कें द्रापासून दोनशे मीटरपेक्षा कमी अंतरावर काही राजकीय कार्यकर्त्यांकडून गर्दी जमवून राजकीय चिन्ह असलेल्या चिठ्ठ्या मतदारांच्या हातात देताना पोलिसांना आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी संशयित गुलजार गुलामगौर कोकणी, अलताफ बशीर पठाण, नवीद अनिस पटेल या तिघांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा मुंबईनाका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वरील संशयित एका राजकीय पक्षाच्या उमेदवाराच्या निवडणूक निशाणी असलेल्या चिठ्ठ्या बुथ क्रमांक १६३ ते १६९च्या दरम्यान, दोनशे मीटरपेक्षा कमी अंतरावर उभे राहून येणाऱ्या मतदारांना सदर चिठ्ठ्या वाटप क रत होते. यावेळी पोलिसांनी या तिघा संशयितांना तत्काळ ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येऊन गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास मुंबईनाका पोलीस करत आहेत.
दुसरी घटना वरीलप्रमाणे म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत शिवाजी विद्यालय केंद्राजवळ मखमलाबाद शिवारात घडली. या घटनेतही काही राजकीय कार्यकर्ते एका राजकीय पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने निवडणूक निशाणी असलेल्या चिठ्ठ्या वाटतांना पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी संशयित अनिकेत प्रभाकार ढुमसे (रा. मखमलाबाद) यास ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हा म्हसरूळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास अहिरे करीत आहेत.
सहा हजारांची रोकड जप्त
देवळाली कॅम्प परिसरातील धोंडीरोडवरून एक संशयास्पद मोटार लोकांना पैसे वाटप करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गस्तपथकाने धोंडीरोड गाठले. यावेळी इंडिगो मोटार (एम.एच.१५बीडी८०३६) संशयास्पद आढळून आली. पोलिसांनी या वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये एका राजकीय पक्षाच्या निवडणूक प्रचार साहित्य तसेच ५९०० रुपये रोख स्वरूपात आढळून आले. याप्रकरणी संशयित आरोपी भीमा पोपट आहेर (रा.चरणवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title:  Political icons spread on voter papers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.