राजकीय हालचाली गतिमान

By admin | Published: October 1, 2015 12:04 AM2015-10-01T00:04:11+5:302015-10-01T00:05:55+5:30

नगरपालिका निवडणूक : आजपासून उमेदवारी अर्ज

Political movements accelerate | राजकीय हालचाली गतिमान

राजकीय हालचाली गतिमान

Next

कळवण : नगरपंचायतच्या १७ जागांसाठी गुरुवारपासून (दि. १) उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार असून, आॅनलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज भरले जाणार असल्याने उमेदवारांची चांगलीच धावपळ उडणार असून, सायबर कॅफेवर आजपासून उमेदवारांची गर्दी होणार आहे.
राजकीय पातळीवर हालचाली गतिमान झाल्या असून, पक्षपातळीवर बैठकीनी वेग घेतला आहे. इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे
कळवण नगरपंचायतसाठी १ नोव्हेंबरला मतदान होणार असून, २ नोव्हेंबरला कळवण नगरपंचायतमधील सत्तेचे चित्र स्पष्ट होणार आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी यांनी कळवण नगरपंचायतचा निवडणूक कार्यक्र म जाहीर केला असून, कळवण नगरपंचायतच्या कार्यक्षेत्रात २९ सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू केली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येणार आहे.
कळवण नगरपंचायतच्या १७ जागांसाठी १ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३0 ते सायंकाळी ५.३0 या वेळेत मतदान होणार आहे, तर २ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. व निकाल जाहीर करण्यात येणार आहे. आरक्षित जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जातीचे प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक रहाणार आहे. परंतु जातवैधता प्रमाणपत्र नसल्यास जातपडताळणीकरिता पडताळणी स्ािमतीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा अन्य कोणताही पुरावा सादर करावा लागणार आहे ,अशा उमेदवारांना निवडून आल्याचे घोषित झाल्यापासून ६ मिहन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे अन्यथा त्यांची निवड पूर्वलक्षी प्रभावाने रद्द केली जाणार आहे, तसेच निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत कळवण नगरपंचायतच्या उमेदवारांना निवडणूक खर्चाचा तपशील द्यावा लागणार आहे
कळवण नगरपंचायत निवडणूक कार्यक्र म घोषित करण्यात आला असून आज १ आॅक्टोबर पासून ८ आॅक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज आॅनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार असून उमेदवार अर्जाची छाननी ९ आॅक्टोबर रोजी होणार असून १९ आॅक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.
२६ आॅक्टोंबर रोजी मतदान केंद्र यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, १ नोव्हेंबरला मतदान होणार असून २ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहे अशी माहिती कळवणचे तहसीलदार अनिल पुरे यांनी दिली कळवण तहसील कार्यालयात आज सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत कळवण नगरपंचायतच्या संदर्भात बैठकीचेआयोजन करण्यात आले होते. (वार्ताहर)

Web Title: Political movements accelerate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.